Arjun Tendulkar SMAT 2022 : सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरची (Arjun Tendulkar) सध्या चांगलीच चर्चा आहे. वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने आपल्या भेदक गोलंदाजीने स्पर्धेत आपली हवा केलीय. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात (Hyderabad vs Goa) अर्जुन तेंडुलकरने केवळ चार षटकात 10 धावा देत तब्बल चार विकेट घेतल्या. यात एका षटकात एकही धाव दिली नाही. टी20 क्रिकेटमधलं अर्जुन तेंडुलकरची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. अर्जुन तेंडुलकर स्थानिक क्रिकेटमध्ये गोवा संघाकडून खेळतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादविरुद्ध दमदार कामगिरी
हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात अर्जुनने पहिल्या षटकात केवळ एक धाव दिली. त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने एक विकेट घेतली. हैदराबादच्या प्रतीक रेड्डीला त्याने पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. डाव्या हाथाच्य या वेगवान गोलंदाजाने शेवटच्या षटकात तब्बल तीन विकेट घेतल्या. यात तिलक वर्मा, राहुल बुद्धी आणि रवी तेजाची विकेट घेतली. अर्जुनच्या या शानदार कामगिरीनंतरही हैदराबादने सहा विकेट गमावत 177 धावा केल्या.


मणिपूरविरुद्धही चांगली गोलंदाजी
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरचा हा तिसरा सामना होता. पहिल्या त्रिपूराविरुद्धच्या सामन्यात अर्जुनने चार षटकात 20 धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. त्यानंतर मणिपूरविरुद्धच्या सामन्यातही त्याने चार षटकात 20 धावा दिल्या. पण या सामन्यात त्याने 2 विकेट घेतल्या. आता हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अर्जुनने आपली कामगिरी आणखी उंचावली आहे. 


योगराज सिंह यांनी दिलं प्रशिक्षण
23 वर्षांच्या अर्जुन तेंडुलकरने दिग्गज अष्टपैलू युवराज सिंह याचे वडिल योगराज सिंह यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं. डीएवी कॉलेजच्या क्रिकेट अकॅडमीत योगराज सिंह यांनी अर्जुनला गोलंदाजीतले बारकावे शिकवले. योगराज सिंह यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अर्जुनबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.


आयपीएलमध्ये मिळाली नाही संधी
आयपीएल 2022 हंगामात (IPL 2022) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indiance) अर्जुन तेंडुलकरवर 30 लाखांची बोली लावत आपल्या संघात घेतलं. पण या हंगामात त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये अर्जुन मुंबईच्या संघाकडून खेळत होता. पण इथेही त्याला म्हणावी तशी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे त्याने गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला.