Arjun Tendulkar : गोव्याच्या रणजी टीमकडून अर्जुनला झटका; थेट टीममधून केलं बाहेर
Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये अर्जुनने जवळपास 3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर डेब्यू केलं. यावेळी त्याला केवळ मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. अशातच आता गोव्याच्या टीमने देखील त्याला टीममधून वगळलं आहे.
Arjun Tendulkar : क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरचा ( Sachin Tendulkar ) मुलगा अर्जुनचं नाव सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अर्जुनने जवळपास 3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर डेब्यू केलं. यावेळी त्याला केवळ मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. यानंतरच्या सामन्यांमध्ये अर्जुनचा ( Arjun Tendulkar ) प्लेईंग 11 मध्ये समावेश करता आला नाही. अशातच अर्जुनला आता अजून एक मोठा धक्का बसला आहे.
आयपीएलपूर्वी 2022 मध्ये अर्जुनने फर्स्ट क्लासमध्ये डेब्यू केलं होतं. तर रणजी ट्रॉफीमध्ये अर्जुन ( Arjun Tendulkar ) गोव्याच्या टीमकडून खेळताना दिसला. मात्र आता अर्जुनसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अर्जुन आता रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार नाहीये. गोवा क्रिकेट असोसिएशनने नुकतंच अर्जुन संदर्भात मोठी घोषणा केलीये.
गोव्याच्या टीममधून अर्जुनचा पत्ता कट
अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) ने गेल्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये डेब्यू केलं होतं. यावेळी डेब्यू सामन्यातच त्याने शतक झळकावत त्याने स्वतःचं नाणं खणखणीत वाजवलं होतं. रणजीमध्ये अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) नेही शानदार गोलंदाजी केली होती. अर्जुन ( Arjun Tendulkar ) च्या शानदार कामगिरीमुळे त्याला लवकरच टीम इंडियामध्ये संधी मिळेल अशी चर्चा रंगली होती. अशातच आता अर्जुन तेंडुलकरला मोठा धक्का बसलाय.
गोवा क्रिकेट असोसिएशनने रणजी ट्रॉफीच्या पुढच्या सिझनसाठी खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर केलीये. या यादीमध्ये एकूण 28 खेळाडूंचं नाव आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 28 जणांमध्ये अर्जुनचं नाव नाहीये. त्यामुळे गेल्या रणजीमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या अर्जुन ( Arjun Tendulkar ) साठी हा मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे एकंदरीत गोव्याच्या टीमकडून अर्जुनला डच्चू देण्यात आला आहे.
येत्या 24 जुलैपासून देवधर ट्रॉफीला भारतात सुरुवात झालीये. गोवा रणजी क्रिकेट टीममधून वगळलेला अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) सध्या देवधर ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागीय टीमचा भाग आहे. मयंक अग्रवाल या टीमचं नेतृत्व करतोय. अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून, फलंदाजीही करतो. मागील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला मैदानात खेळण्याची संधी दिली होती. पण अर्जुन तेंडुलकर या संधीचं सोनं करता आलं नाही.
अर्जुनने केला खास फोटो शेअर
अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) सोशल मीडियावर बऱ्यापैकी एक्टिव्ह असतो. अर्जुन तेंडुलकर नेहमी आपल्या फिटनेसकडे लक्ष देतो. अर्जुनला जीममध्ये वेळ घालवणं फार आडवतं. त्याचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं तर त्याने अनेकदा जीममध्ये व्यायाम करतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अर्जुन तेंडुलकरने आपले सिक्स पॅक अॅब दाखवले असून त्याच्या फिटनेसची चर्चा रंगली आहे.