मुंबईमध्ये आला हा नवा खेळाडू, नीता अंबानींची इच्छा पूर्ण
मुंबईच्या संघात जुळलं नवं नाव
मुंबई : आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये मुंबईला आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करता आलेली नाही. मागच्या सीजनमध्ये चॅम्पियन ठरलेली मुंबईची यंदा मात्र सुरुवात खराब झाली. पहिल्याच सामन्यामध्ये त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. पण मुंबईच्या टीममध्ये आता आणखी एक नाव जुळलं जाणार आहे. नीता अंबानी यांची या खेळाडूला आपल्या संघात घेण्याची खूप इच्छा होती.
क्रिकेटर सचिन तेंडुलकर यावेली मुंबई टीमचा मेंटोर आहे. आता सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील मुंबईच्या सपोर्ट स्टाफमध्ये दिसणार आहे. अर्जुन आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतो आहे. सचिनचं स्वप्न आहे की, त्याच्या मुलाने देखील जगात प्रसिद्ध क्रिकेटर बनावं. अर्जुन काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये नेटमध्ये गोलंदाजी करतांना दिसला होता.
अर्जुनची फिटनेस एकदम छान आहे. त्यामुळे तो आपल्या ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचेल. आयपीएल भारतात खूप लोकप्रिय आहे. नव्या खेळाडूंना येथे संधी मिळते. अर्जुनला मैदानात पाहून नीता अंबानी खूप खूश आहेत. नीता अंबानीना अर्जुनला आपल्या टीममध्ये पाहायचं होतं.