IPL 2022 : बंगळूरूविरूद्धच्या मुंबईच्या ताफ्यात अर्जुन तेंडुलकरचा होणार समावेश?
आता अर्जुनला मुंबईच इंडियन्सच्या टीममध्ये सामाविष्ट करण्याची मागणी करण्यात येतेय.
मुंबई : 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी 15 वा सिझन हा जणू एका वाईट स्वप्नाप्रमाणे आहे. यंदाच्या सिझनमध्ये मुंबईच्या टीमला अजून एकंही विजय नोंदवता आलेला नाही. यानंतर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. दरम्यान अशा स्थितीत अर्जुन तेंडुलकर ट्रेंडिंगमध्ये आल्याचं दिसून आलं आहे.
सलग तिसऱ्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरचे फॅन्स आता अर्जुनला मुंबईच इंडियन्सच्या टीममध्ये सामाविष्ट करण्याची मागणी करत आहेत. मुंबईचा ऑलराऊंडर डॅनियल सॅम्सच्या खराब परफॉर्मन्सनंतर अर्जुन तेंडुलकरचा डेब्यू व्हाला अशी मागणी सोशल मीडियावर होताना दिसतेय.
अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये मुंबई टीमने 30 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं. विशेष म्हणजे IPL 2021 मध्ये अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता चाहत्यांच्या मागणीनंतर कर्णधार रोहित शर्मा अर्जुनचा टीममध्ये समावेश करण्याची शक्यता आहे.
यावेळी युझर्सने म्हटलंय की, वेळ आली आहे अर्जुनचा टीममध्ये समावेश करण्याचा. तर दुसऱ्या एका युझरने लिहिलं आहे की, सॅमऐवजी अर्जुनचा टीममध्ये समावेश करा, त्याला इंटर्नशिप करण्यासाठी ठेवलं आहे का?
कोलकाताविरूद्धच्या सामन्यान डॅनियल सॅमने एका ओव्हरमध्ये 35 रन्स दिले. यामुळे मुंबईला तो सामना गमवावा लागला. यानंतर डॅनियल सॅमला टीममधून बाहेर करून अर्जुनला टीममध्ये घेण्याची मागणी करण्यात येतेय.