गोवा : सध्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या नावाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. सध्या अर्जुन तेंडुलकर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 मध्ये खेळतोय. या स्पर्धेमध्ये तो गोव्याकडून खेळताना दिसतोय. दरम्यान गोवा विरुद्ध मणिपूर सामन्यात अर्जुन तेंडुलकरने चमकदार कामगिरी करत चाहत्यांना खूश केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मणिपूरविरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने 5 च्या इको रेटने गोलंदाजी करताना 4 ओव्हर्समध्ये त्याने 20 रन्स देत 2 विकेट्स पटकावले. अर्जुन तेंडुलकरने कर्णजित युमनम आणि प्रफुल्लोमणी सिंग यांची विकेट घेतली. शिवाय अर्जुनच्या गोलंदाजी समोर भलेभले फलंदाजही फेल होताना दिसले.


सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्जुनची कामगिरी पाहिल्यानंतर आता सोशल मीडियावर त्याचं टीम इंडियामध्ये सिलेक्शन व्हावं यासाठी मागणी करण्यात करण्याची मागणी करण्यात येतेय. 


'अर्जुन तेंडुलकर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, त्यानुसार तो टीम इंडियामध्ये येऊ शकतो.' असं एका युजरने म्हटलंय. तर अजून एका यूजरने लिहिलंय की, 'अर्जुन तेंडुलकरला टीम इंडियामध्ये संधी देण्याची वेळ आली आहे.'





योगराज सिंग यांच्याकडून घेतलं प्रशिक्षण


अर्जुन तेंडुलकर योगराज सिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं आहे. गेल्या महिन्यात त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये अर्जुन योगराजकडून प्रशिक्षण घेताना दिसत होता. मुख्य म्हणजे यासाठी तो चंदीगडला पोहोचला होता.