Arjun Tendulkar IPL 2025 : आयपीएल 2025 साठी (IPL 2025) सौदी अरेबीयाच्या जेद्दाह येथे मेगा ऑक्शन पार पडलं. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये एकूण 577 खेळाडूंवर बोली लावण्यात आली, त्यापैकी केवळ 182 खेळाडूंवर फ्रेंचायझींनी पैसे खर्च करून आपल्या संघात घेतलं. यंदा मेगा ऑक्शनमध्ये अनेक तरुण नव्या खेळाडूंचं नशीब फळफळल फ्रेंचायझींनी त्यांच्यावर करोडो रुपये खर्च केले तर दुसऱ्या बाजूला अनेक दिग्गजांवर रुपयाही न लावल्याने त्यांना अनसोल्ड रहावे लागेल. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन (Arjun Tendulkar) देखील यंदा ऑक्शनचा भाग होता. तो ही अनसोल्ड होण्यापासून थोडक्यात वाचला. 


अर्जुनला पाहून सर्व संघांनी नाक मुरडलं : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन तेंडुलकर हा आयपीएल 2022 पासून मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी त्याला रिटेन करण्यात आले नाही. त्यामुळे त्याला मेगा ऑक्शनमध्ये उतरावे लागेल. अर्जुनने 30 लाखांच्या बेस प्राईजवर स्वतःच नाव नोंदवलं होतं. सोमवारी मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी रात्री उशीरा ऑक्शन टेबलवर अर्जुन तेंडुलकर आला. मात्र तो पर्यंत जवळपास सर्वच संघांचा खिसा रिकामा होत आला होता. ऑक्शनर मल्लिका सागर हिने ऑल राउंडर अनकॅप खेळाडू म्हणून अर्जुनचं नाव पुकारलं. परंतु पहिल्या राउंडला अर्जुनवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही, यामुळे अर्जुन पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड राहिला. 


अर्जुन तेंडुलकर सध्या रणजी ट्रॉफीमध्ये गोवा संघाकडून खेळतो. काही दिवसांपूर्वीच गोवा क्रिकेट असोसिएशनच्या टीमकडून थिमाप्पिया मेमोरियन टूर्नामेंटमध्ये खेळत असताना त्याने गोलंदाजी करताना त्याने तब्बल ९ विकेट्स घेतल्या. अर्जुनच्या फर्स्ट क्लास क्रिकेट करिअरबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 13 सामन्यांमध्ये आतापर्यंत 21 विकेट्स घेतल्या आहेत. यासह अर्जुनने रणजी ट्रॉफी सामन्यात एक शतक ठोकलं असून त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 481 धावा निघाल्या आहेत. त्यामुळे अर्जुनसाठी आयपीएल संघ मोठी बोली लावतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं होताना दिसलं नाही. 


हेही वाचा : IPL Auction : CSK ने कोणावर खर्च केले सर्वाधिक पैसे? किती खेळाडूंना खरेदी केलं? पाहा संपूर्ण लिस्ट


 


दुसऱ्या आणि शेवटच्या राउंडला पुन्हा ऑक्शन टेबलवर अर्जुन तेंडुलकरचे नाव पुकारण्यात आले. तेव्हा देखील कोणताही संघ अर्जुनसाठी बोली लावण्यास तयार नव्हता. पण अखेर मुंबई इंडियन्सने अर्जुनसाठी धावून आली आणि त्यांच्याकडून अर्जुनला बेस प्राईजवर विकत घेण्यासाठी बोली लावण्यात आली. त्याला कोणत्याही संघाने काउंटर न केल्यामुळे अर्जुनला मुंबई इंडियन्सने खरेदी केले. 


आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ : 


रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रॉबीन मिन्झ, करण शर्मा, रायन रिकेल्टन, अल्लाह गाझनफर, अश्वीन कुमार, मिचेल सॅण्टनर, रेस टॉप्ले, श्रीजित कृष्णन्, राज अंगद बावा, सत्य नारायण राजू, बिवेन जॅकब्स, अर्जुन तेंडुलकर,  लिजाड विल्यम्स, विग्नेश पुथ्थूर, नमन धीर, विल जॅक्स, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट