SRH vs MI IPL 2023: यंदाचा आयपीएलचा (IPL 2023) सिझन मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) उत्तम असल्याचं दिसतंय. मुंबईचे आतापर्यंत 5 सामने झाले असून 3 सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवता आला. यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे, यंदाच्या सिझनमध्ये अर्जुनला (Arjun Tendulkar) टीममध्ये संधी देण्यात आली आहे. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने त्याच्या आयीपीएल करियरमधील पहिली विकेट घेतली. दरम्यान यावर अनेकांनी रिएक्शन दिल्या. मात्र अर्जुनच्या कथित गर्लफ्रेंडची कोणीतीही रिएक्शन समोर न आल्याने एकच चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात शेवटची विकेट घेत अर्जुनने मुंबईला विजय मिळवून दिला. भुवनेश्वर कुमारची ही विकेट अर्जुनच्या आयपीएल करियरमधील पहिली विकेट होती. ज्यानंतर त्याच्या कुटुंबासोबत त्याच्या चाहत्यांनीही त्याचं अभिनंदन केलं. मात्र त्याच्या कथित गर्लफ्रेंडने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


डेब्यू केल्यानंतर केलं होतं अभिनंदन


काही काळापूर्वी इंग्लंडच्या महिला टीमची खेळाडू डॅनियल वॅट आणि अर्जुन तेंडुलकर यांचं नाव एकमेकांसोबत जोडलं जातं होतं. या दोघांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा देखील रंगल्या होत्या. कोलकाना नाईट रायडर्सविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने आयपीएलमध्ये डेब्यू केला. त्यावेळी डॅनियलने तिच्या अकाऊंडवरून स्टोरी शेअर करत अर्जुनचं अभिनंदन केलं होतं. मात्र आयपीएलमध्ये पहिली विकेट घेतल्यानंतर डॅनियल कडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही


कोण आहे डॅनियल वॅट


डॅनियल वॅट इंग्लंडची महिला खेळाडू असून एकेकाळी हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. या दोघांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र दोघांकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. 


डॅनियलचा नुकताच झाला साखरपुडा


2 मार्च रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून डॅनियलने साखरपुडा झाल्याचं स्पष्ट केलं. यावेळी डॅनियलने तिची पार्टनर जॉर्जी हॉजसोबत साखरपुडा केला. तिने समलिंगी संबंधांवरून पडदा हटवून त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. 


अर्जुनच्या विकेटवर सचिनचं खास ट्विट


अर्जुनने पहिली विकेट घेतल्यानंतर सचिन तेंडुलकरने मुलासाठी खास ट्विट केलं होतं. त्याच्या ट्विटमध्ये सचिन म्हणाला होता की, मुंबई इंडियन्सकडून पुन्हा एकदा चांगली कामगिरी झाली आहे. कॅमेरून ग्रीनसोबत इशान आणि तिलक यांनीही उत्तम फलंदाजी केली. आणि आता अखेर तेंडुलकरांनाही आयपीएलची पहिली विकेट मिळाली आहे.