IPL 2023: इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या (IPL 2023) सिझनला सुरुवात झाली. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीम आज यंदाच्या सिझनमधील दुसरी मॅच खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्जसोबत (Chennai Super Kings) हा सामना रंगणार आहे. मुंबईच्या टीमला हा सामना जिंकून या सिझनमध्ये पहिल्या विजयाची नोंद करायची आहे. मात्र आजच्या या सामन्यापूर्वीच मुंबईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा धडाकेबाज गोलंदाज दुखापतीमुळे आजचा सामना खेळणार नसल्याची चिन्ह आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या 16 व्या सिझनपूर्वीच अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहे. खेळाडूंच्या या वाढत्या दुखापतीमुळे आयपीएलचा रोमांच काहीसा कमी होताना दिसतोय. अशातच मुंबईच्या टीमचा गोलंदाज जोफ्रा आर्चर याला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. 


चेन्नईविरूद्ध खेळणार Jofra Archer?


मुंबई इंडियन्सविरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यामध्ये झाला असून मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आजचा सामना मुंबईला जिंकावा लागणार आहे. मात्र त्याचपूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची चिंता वाढली आहे. टीमचा सर्वात महत्त्वपूर्ण गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीने चेन्नई विरूद्धचा सामना खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दरम्यान याबाबत मुंबईकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


अर्जुन तेंडुलकरला मिळणार का संधी?


जोफ्रा आर्चरच्या जागी टीममध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) नावाची प्रचंड चर्चा आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोच मार्क बाऊचर यांची पत्रकार परिषद झाली होती. यामध्ये कोच बाऊचर यांनी, अर्जुनला खेळायची संधी मिळू शकते, असे संकेत दिले होते. त्यामुळे चेन्नईविरूद्धच्या सामन्यात अर्जुनचा समावेश केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन


रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, टिम डेविड, अरशद खान, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि जेसन बेहरनडॉर्फ.


मुंबई इंडियन्सच्या टीमची संपूर्ण स्वॉड


रोहित शर्मा, इशान किशन, कॅमरुन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, बेहरनडॉर्फ, आकाश मधवाल, आणि ट्रिस्टन स्टब्स.