गॉल :  भारत आणि श्रीलंका दरम्यात गॉल येथे खेळविण्यात येणाऱ्या सामन्यात श्रीलंकेला मोठा झटका बसला आहे. श्रीलंकन टीमचा मिडल ऑर्डर फलंदाज असेना गुणरत्नेजखमी होऊन मॅचच्या बाहेर गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरूद्ध पहिल्या दिवशी फिल्डिंग करतना गुनारत्नेच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला. त्यानंतर त्याला सर्जरीसाठी कोलंबोला रवाना करण्यात आले. 


स्लिपमध्ये फिल्डिंग करताना लाहिरू कुमारच्या चेंडूवर शिखर धवनचा कॅच पकडण्याचा प्रयत्न करत असताना गुनारत्नेच्या अंगठ्याला जखम झाली. यावेळी धवन ३१ धावांवर खेळत होता. यानंतर त्याने जीवनदान मिळाल्यावर १९० धावांची खेळी केली. 


गुनारत्नेच्या जखमी झाल्याने श्रीलंकेच्या फलंदाजीला मोठा झटका बसला आहे. यापूर्वी श्रीलंकेचा नवनियुक्त कर्णधार दिनेश चांदीमल याला निमोनिया झाल्याने तो पहिली टेस्ट खेळू शकला नाही. 


गुणरत्नेयाने नुकतेच झिम्बाब्वे विरूद्ध खेळताना एक मात्र टेस्टमध्ये नाबाद ८० धावा करून श्रीलंकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.