मुंबई: टी 20 वर्ल्ड कपचे सामने सुरू आहेत. याच दरम्यान एक मोठी अपडेट येत आहे. टी 20 वर्ल्ड कपमधून दिग्गज खेळाडूनं अचानक संन्यास घेतला आहे. या खेळाडूनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड मोडला होता. T20 वर्ल्ड कप 2021 चे सामने UAE आणि ओमानमध्ये खेळले जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडसारख्या छोट्या संघांनीही यंदा चांगली कामगिरी केली आहे. पण त्याच दरम्यान, टी 20 वर्ल्ड कपच्या मध्यामध्ये एका दिग्गज क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली. अफगाणिस्तानचा दिग्गज फलंदाज असगर अफगाण याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


नामिबिया विरुद्ध अफगाणिस्तान झालेल्या सामन्यानंतर अफगाणणं ही घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी ट्वीट करत ही माहिती दिली. 


अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाणने नामिबिया विरुद्धच्या सामन्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. असं ट्वीट अफगाणिस्तान बोर्डाने केलं आहे. असगर अफगाण याने कर्णधारपदाच्या बाबतीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकलं होतं. 


असगर असा कर्णधार आहे ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने जिंकले आहेत. धोनीच्या नावावर 41 टी 20 सामने जिंकल्याचा विक्रम होता. तर अफगाणच्या नावावर 42 सामने जिंकल्याचा विक्रम आहे. अफगाणिस्तानपेक्षा आजपर्यंत कोणत्याही कर्णधाराने टी-20 सामना जिंकलेला नाही.