नवी दिल्ली : क्रिकेट मॅच दरम्यान स्टेडिअममध्ये बसलेले प्रेक्षक अनेकदा विचित्र प्रकार करत असल्याचं समोर आलं आहे. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


प्रेक्षकांचे अजब कृत्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाईव्ह मॅच दरम्यान कॅमेऱ्यात आपण दिसावं यासाठी काही प्रेक्षक विविध वेशभूषा करतात, काही क्रिकेटर्सला प्रपोज करणारे बॅनर्स झळकावतात तर काही जर चक्क स्टेडिअममध्येच प्रपोज करतात.


स्टेडिअममध्ये रोमॅन्टिक वातावरण


सध्या ब्रिस्बेनमधील गाबामध्ये अॅशेस सीरिजची पहिली टेस्ट मॅच खेळली जात आहे. अॅशेस सीरिज नेहमीच चर्चेत राहते. मात्र, यावेळी चर्चेत असण्यामागचं कारणंही काही खास आहे. टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी एका कपलने स्टेडिअममध्ये साखरपूडा केला. यामुळे संपूर्ण स्टेडिअममध्ये रोमॅन्टिक वातावरण निर्माण झालं.


स्टेडिअममध्ये केलं प्रेम व्यक्त 


मॅच सुरु असताना एका व्यक्तीने क्रिकेट मॅच सुरु असतानाच स्टेडिअममध्ये आधी आपल्या प्रेयसीला प्रपोज केलं आणि त्यानंतर सर्वांसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं.


स्टेडिअममध्ये प्रपोज 


मायकल लँग्रिज नावाच्या व्यक्तीने आपल्या प्रेयसीला गाबा स्टेडिअममध्ये प्रपोज केलं. इंग्लंडने केलेल्या ३०२ रन्सनंतर मॅचच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन बॅट्समन मैदानात उतरले. बॅट्समन क्रिजवर जात असतानाच मायकलने आपल्या प्रेयसीला रिंग देत प्रपोज केलं.




ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. व्हिडिओत दिसत आहे की, तो तरुण प्रपोज करत आहे. प्रेयसीने भावूक होत प्रपोजल स्विकारलं.