ENG vs AUS : सामना जिंकूनही ऑस्ट्रेलियाला मोठा फटका; ICC ने इंग्लंडलाही ठोठावला दंड
ICC Fined For AUS and ENG : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England vs Australia ) यांच्यामध्ये अॅशेज सिरीज खेळवण्यात येतेय. पहिल्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. याचं कारण म्हणजे आयसीसीने ( ICC ) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीम्सवर कारवाई केलीये.
Ashes 2023 ENG vs AUS : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England vs Australia ) यांच्यामध्ये अॅशेज सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील पहिला सामना खेळवण्यात आला असून ऑस्ट्रेलियाने अवघ्या 2 विकेट्सने हा सामना जिंकला. एजबेस्टनमध्ये ( Edgbaston test ) मिळालेल्या विजयामुळे सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतलीये. दरम्यान या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. याचं कारण म्हणजे आयसीसीने ( ICC ) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीम्सवर कारवाई केलीये.
ICC ने दोन्ही टीम्सविरूद्ध घेतली एक्शन
एजबेस्टन टेस्ट संपल्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England vs Australia ) या दोन्ही टीम्सवर आयसीसीने एक्शन घेतलीये. स्लो ओव्हर रेट प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीने ( ICC ) यासंदर्भात प्रेस रिलीज जाहीर केलंय. यामध्ये नमून केल्यानुसार, दोन्ही टीम्सने निर्धारित वेळेपेक्षा दोन ओव्हर्स कमी टाकल्याने आयसीसीचे ( ICC ) सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांना दंड ठोठावलाय.
दरम्यान यासंदर्भात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांनी चूक मानली असून संबंधित शिक्षा देखील स्विकारलीये. स्लो ओव्हर रेट प्रकरणी दोन्ही टीम्सची 40 टक्के फी कापण्यात आली आहे.
WTC च्या पॉईंट्स टेबलमध्येही पडणार फरक
पहिला सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाला ( England vs Australia ) 12 गुणांसह WTC पॉईंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान देण्यात आलंय. मात्र स्लो ओव्हर रेटमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) मॅच फीसह WTC चे 2-2 पॉईंट्स कापलेत. आयसीसीच्या ( ICC ) निर्णयानंतर ऑस्ट्रेलियाचे डब्ल्यूटीसी पॉईंट्स टेबलमध्ये 10 गुण झालेत.
स्लो ओव्हरचा नियम काय सांगतो?
ICC आचारसंहितेच्या कलम 2.22 किमान ओव्हर-रेटच्या संबंधित आहे. खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक ओव्हरसाठी त्यांच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला जातो. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्याच्या अटींच्या कलम 16.11.2 नुसार, फेकलेल्या प्रत्येक ओव्हरसाठी एक गुण दंड आकारला जातो.