स्मिथच्या रनआऊटमुळं Ashes दरम्यान भर मैदानात हाय व्होलटेज ड्रामा; Out की Not Out?
Steve Smith Run Out: आतापर्यंत तुम्ही अनेक क्रिकेट सामने पाहिले असलीत पण, स्टीव्ह स्मिथच्या रन आऊटमुळं झालेला गोंधळ मात्र पहिल्यांदाच पाहायला मिळाला असेल.
Ashes 2023 Steve Smith Run Out: क्रिकेट जगतामध्ये काही स्पर्धांना मानाचं स्थान आहे. त्यातचील एक म्हणजे अॅशेज. जेंटमेन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये अॅशेजला मानाचं स्थान. ही स्पर्धा जरी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये खेळवली जात असली तरीही अनेक क्रिकेटप्रेमींच्या हा जिव्हाळ्याचा विषय. अशी ही स्पर्धा सध्या सुरु असून, दोन्ही संघांकडून तोडीस तोड अशाच खेळाचं प्रदर्शन केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. याच अॅशेजमध्ये नुकताच एक नाट्यमय प्रसंग भर मैदानातच पाहायला मिळाला.
लंडन येथील ओव्हल मैदानात अॅशेजमधील पाचवा कसोटी सामना खेळवला जात असून, त्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु असताना एकच गोंधळ पाहायला मिळाला. सोशल मीडियावर या क्षणाचा एक व्हिडीओसुद्धा प्रचंड व्हायरल झाला. निमित्त ठरला तो म्हणडे स्टीव्ह स्मिथ.
सामन्यादरम्यान नेमकं काय झालं?
ओव्हल मैदानात खेळवल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यावर इंगलंडच्या संघानं चांगलीच पकड मिळवल्याचं पाहायला मिळत असतानाच डाव पलटला. ऑस्ट्रेलिया संघातील अष्टपैलू खेळाडू स्टीव्ह स्मिथ यानं त्याच्या फलंदाजीनं इंग्लंडच्या गोंलदाजांच्या नाकीनऊ आणले. तेव्हाच एक क्षण असा आला जेव्हा इंग्लंडच्या संघानं सापळा रचत स्मिथला धावबाद केलं. याचं श्रेय गेलं इंग्लंडचा खेळाडू गॅरी प्रेट याच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाला आणि त्यानं विकेटचा नेम घेत केलेल्या थेट माऱ्याला. तिथं असणाऱ्या यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टोनंही संधी साधत तातडीनं स्मिथला बाद करण्यात क्षणाचाही विलंब केला नाही.
हेसुद्धा वाचा : WTC Points Table: पाकिस्तानच्या विजयाने भारताचं गणित फिस्कटलं; पाहा कसं बदललं समीकरण
हे इतकं थरारनाट्य झाल्यानंतर आपण बाद झालो आहोत असंच स्मिथला वाटलं आणि त्यानं पवेलियनची वाट धरली. पण, दोन ते तीन मिनिटांनी सामन्याला वेगळंच वळण मिळालं. जिथं वारंवार विकेटचा Replay पाहिल्यानंतर थर्ड अंपायर नितिन मेनन यांचं लक्ष स्टंपवर असणाऱ्या विकेट्सकडे गेलं. ज्यावेळी चेंडू विकेट्सना लागला होता तेव्हा त्या स्टंपवरच होत्या. हे वारंवार पाहिल्यानंतर त्यांनी स्मिथला Not Out ठरवलं.
बस्स, मग काय? अंपायच्या या निर्णयावर इंग्लंडच्या संघाचा संताप अनावर झाला. बरं, खुद्द स्मिथही या निर्णयानं अवाक् होता. त्यानं ही मिळालेली संधी साधत सामना गाजवला आणि अर्धशतकी खेळी करत संघाला मोठा आधार दिला.