England vs Australia Ashes Series 2023 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England vs Australia ) यांच्यामध्ये अॅशेज सिरीजमधील ( Ashes Series 2023 ) दुसरा सामना खेळवला गेला. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर ( Lords ) हा सामना खेळवला गेला असून इंग्लंडला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा 43 रन्सने पराभव करत सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या अॅशेजमध्ये ( Ashes Series 2023 ) ऑस्ट्रेलियाचं पारड जड मानलं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 371 रन्सचं जिंकण्यासाठी लक्ष्य दिलं होतं. बेन स्टोक्सच्या शतकी खेळीच्या जोरावरही इंग्लंड केवळ 327 रन्स करू शकली. 155 रन्स करणाऱ्या बेन स्टोक्सची संपूर्ण मेहनत मात्र पाण्यात गेली. 


इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ( Ben Stokes ) त्याच्या उत्तम फलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकली. इंग्लंड फलंदाजी करत असताना 193 रन्सवर सहा विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडचा मोठा पराभव अटळ होता. मात्र तरीही कांगारूंसमोर कर्णधार स्टोक्स ( Ben Stokes ) एकटा उभा राहिला आणि लढला. मात्र त्याची ही खेळी व्यर्थ गेली. स्टोक्सने 214 बॉल्सचा सामना करत 9 सिक्स आणि 9 फोरच्या मदतीने 155 रन्स केले.


स्टोक्स ( Ben Stokes ) बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित झाला. ऑस्ट्रेलियाने ओली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जोश टोंग यांची विकेट घेत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. इंग्लंडकडून बेन स्टोक्सशिवाय बेन डकेटनेही दुसऱ्या डावात 83 रन्स केले. 


कसा झाला दुसरा सामना?


अॅशेज सिरीजमधील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या टीमने टॉस जिंकला होता. टॉस गमावल्यानंतर कांगारूंनी प्रथम फलंदाजी करताना 416 रन्स केले. कांगारूंकडून पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथने 110 आणि ट्रॅव्हिस हेडने 77 रन्स केले. 


इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात बेन डकेटच्या शानदार 98 रन्सच्या खेळीच्या जोरावर 325 रन्स केले. यामुळे ऑस्ट्रेलियाला 91 रन्सची आघाडी मिळाली होती. उस्मान ख्वाजाच्या 77 रन्स जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 279 रन्स केले. 371 रन्सचा पाठलाग करताना 327 रन्सवर इंग्लंड टीम ऑल आऊट झाली आणि ऑस्ट्रेलियाचा सिरीजमध्ये दुसरा विजय मिळवला.