सिडनी : अॅशेस सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमनं एक अनोखी रणनिती आखली आहे. इंग्लंडला क्रिकेटच्या मैदानावर धुळ चारण्यासाठी धूर्त कांगारुांची टीम चक्क जगातील वेगवान धावपटूकडून धडे घेत आहेत.


नवा गेम प्लॅन तयार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या दोन टीम्समधील करो या मरोची लढाई. क्रिकेटच्या मैदानावरील भारत-पाकिस्तान यांच्यातील  लढतींप्रमाणेच अॅशेसला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. हीच अॅशेसची लढाई जिंकण्यासाठी आता ऑस्ट्रेलियन टीमनं नवा गेम प्लॅन तयार केलाय.


उसेन बोल्ट देणार असे धडे


या टीमनं ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट आणि वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर उसेन बोल्टलाच पाचारण केलंय. हातात बॅट घेऊन लायटनिंग बोल्ट सध्या कांगारुंच्या टीमला गुरुमंत्र देतोय. रनिंग बिटविन द विकेट्स  सुधारण्यासाठी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन धावपटूला बोलावण्यात आलंय. कायमच प्रतिस्पर्ध्यांना माईंड गेम खेळत बुचकळ्यात टाकणाऱ्या कांगारुंनी अॅशेससाठी ही नवी खेळी खेळलीय. 


धावण्याचं महत्त्व बोल्ड पटवून देणार


ऑगस्टमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर बोल्टनं अॅथलेटीक्सच्या विश्वाला अलविदा केला. निवृत्तीनंतर बोल्ट धावण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करतोय. आणि आता तर तो क्रिकेटच्या दुनियेतील सर्वोत्तम टीम असलेल्या ऑस्ट्रेलियन टीमलाही मोलाचं मार्गदर्शन करतोय. 


गुरुमंत्र अॅशेसमध्ये कांगारुंना किती फायदेशीर?


ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटूही अगदी बारकाईनं रनिंग बिटविन द विकेट्स कसं उंचावता येईल यासाठी बोल्ट गुरुजींच्या सूचना ऐकतायत. आता बोल्टचा हा गुरुमंत्र अॅशेसमध्ये कांगारुंना किती फायदेशीर ठरतोय याकडेच क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल.