मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांसाठी ३८ वर्षीय आशिष नेहराच्या निवडीने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. यावरुन अनेकांनी टीकाही केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टीकाकारांना नेहराने आपल्या उत्तराने चोख उत्तर दिलेय. नेहरा या वर्षी जानेवारीमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. अनेक महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर त्याची संघात निवड करण्यात आलीये.


दरम्यान, आजच्या पहिल्या सामन्यात नेहराची ११मध्ये निवड करण्यात आलेली नाहीये.नेहराने आपल्या निवडीवरुन टीकाकारांना चांगलेच उत्तर दिलेय. नेहरा म्हणाला, मी अजूही फिट आहे आणि भारताकडून आणखी दोन वर्षे क्रिकेट खेळू शकतो. 


एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नेहरा म्हणाला, मी गेल्या सात ते आठ वर्षात तितकेसे क्रिकेट खेळलेलो नाहीये. यामुळेच मला खेळायचे आहे. मी गेल्या चार वर्षात स्वत:ला क्रिकेट खेळण्यासाठी मजबूत केलंय. 


३८ व्या वर्षी फिट राहण्याबाबत नेहराला विचारले असता तो म्हणाला, मला वाटते मी अजूनही फिट आहे आणि भारतीय संघासाठी खेळू शकतो. मला माझ्या फिटनेसवर पूर्ण विश्वास आहे. या वयात आपला फिटनेस कायम राखणे कठीण असते मात्र मी त्यासाठी तयार आहे.