मुंबई: आधी क्रिकेटचं मैदान आणि आता टेनिसच्या कोर्टात दिमाखात आपली धमाकेदार कामगिरी करणाऱ्या या महिला खेळाडूचं जगभरात कौतुक होत आहे. या महिला खेळाडूनं Wimbledon 2021विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. विम्बलडनच्या महिला एकेरी सामन्यात  कॅरोलिना प्लिस्कोव्हाला नमवत अॅश्ले बार्टीनं बाजी मारली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बार्टीनं प्लिस्कोव्हाला 6-3, 6(4)- 7 (7), 6-3 अशा सेट्समध्ये नमवलं. अॅश्ले बार्टीने विम्बलडनचा खिताब आपल्या नावावर केला. बार्टीनं पहिल्यांदाच विम्बलडन स्पर्धा जिंकली आहे. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच विम्बलडन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. 


पहिल्या सेटमध्ये दमदार खेळ करणाऱ्या बार्टीला दुसऱ्या सेटमध्ये प्लिस्कोवाने चांगलाच घाम फोडला आणि टायब्रेकरमध्ये विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये बार्टीने कमबॅक केलं आणि अखेर प्लिस्कोवाला पराभूत केलं.



अंतिम सेटमध्ये 25 वर्षीय अॅश्ले बार्टीनेने  कॅरोलिना प्लिस्कोव्हाला कोणतीही संधी दिली नाही. तिने 3-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर स्कोअर 4-2 असा झाला. शेवटी, बार्टीने सेट 6-3 ने खेळून सामना आपल्या नावे केला. हा सामना 1 तास 55 मिनिटे रंगला होता. सप्टेंबर 2019 पासून बार्टी अव्वल क्रमांकावर आहे. एकेरीत हा तिचा एकूण 281 वा विजय आहे. 100 सामन्यात अॅश्लेला पराभव स्वीकारावाला लागला होता. अॅश्लेच्या एकूण कारकीर्दीचे हे 12 वे एकेरीचे विजेतेपद आहे.


क्रिकेटमधील अॅश्लेचं करियर
अ‍ॅश्ले बार्टीने टेनिसआधी 2015-16 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या टी -20 लीग बिग बॅशमध्येही मैदान गाजवलं आहे. ती  ब्रिस्बेन हीट संघाकडून खेळली होती. मात्र तिला अर्धशतक करण्यात यश आलं नाही. त्यावेळी तिने 39 धावा केल्या होत्या. टोकियो ऑलिम्पिकमध्येही ती हाच जोश कायम ठेवेल अशी अशा सर्वांनाच आहे. 


विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं धडक मारली आहे.उपांत्य फेरीत जोकोव्हिचनं शापोवालोव्हचा पराभव केला. जोकोव्हिच सातव्यांदा विम्बलडनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 


आता अंतिम फेरीत जोकोव्हिचची लढत इटलीच्या मटेओ बेरेटिनी विरुद्ध असणार आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत कोण बाजी मारत याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं आहे.