मुंबई : एकदिवसीय आणि ट्वेन्टी - २० संघांमधून खेळलेला फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन अलीकडेच कसोटी संघात परतला आहे. दरम्यान, त्यांचे एक दिवसीय करिअर समाप्त झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, विराट कोहलीने या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनने भरपूर क्रिकेट खेळले आहे. त्याला विश्रांती देण्यात आली आहे, असे विराटने त्याची बाजू सांभाळताना म्हटलेय. आता तो श्रीलंकाविरूद्ध कसोटी मालिकेत परत आला आहे. दरम्यान, अश्विनशी संबंधित एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर अतिशय व्हायरल होत आहे.


 व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली अश्विनची मस्करी करताना दिसत आहेत. या व्हिडिओत अश्विनच्या हिंदीची डर उडविली आहे. हा व्हिडिओ अॅड फिल्मचा भाग आहे.