अश्विनला सोडावे लागले कर्णधारपद, हे आहे कारण
देवधर ट्रॉफी सुरु होण्याआधी भारत अ संघाला मोठा झटका बसलाय. भारत अ संघाचा कर्णधार आर. अश्विनला पायाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेत खेळू शकणार नाहीये.
मुंबई : देवधर ट्रॉफी सुरु होण्याआधी भारत अ संघाला मोठा झटका बसलाय. भारत अ संघाचा कर्णधार आर. अश्विनला पायाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेत खेळू शकणार नाहीये.
बीसीसीआयने बुधवारी याबाबतची माहिती दिली. अश्विनला बीसीसीआयच्या मेडिकल टीमने एक आठवडा आराम करण्याचा सल्ला दिलाय. निवड समितीने अश्विनच्या जागी स्पिन गोलंदाज शाहबाज नदीमला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतलाय.
तर अंकित बावनेकडे कर्णधारपद सोपवण्यात आलेय. देवधर ट्रॉफी ४ ते ८ मार्चदरम्यान हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे खेळवली जाणार आहे.
आयपीएलमध्ये पंजाबचे नेतृत्व करणार
दुखापतीमुळे देवधर ट्रॉफीमध्ये अश्विनला जरी नेतृत्व करता येत नसले तरी आयपीएलमध्ये अश्विनकडे पंजाबची जबाबदारी देण्यात आलीये. कर्णधारपदाच्या शर्यतीत युवराज सिंग होता. मात्र टीम मॅनेजमेंटने अश्विनला पसंती दर्शवली.