कोलकाता : आर. अश्विन एक उत्तम बॉलर आहे हे सगळ्यांना माहित आहे. मात्र तो उत्तम नक्कलही करतो हे आपल्यातील अनेकांना माहित नसेल. त्यानं श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू जयसूर्या याची बॉलिंगची नक्कल केलेला व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झालाय. अश्विननं सरावादरम्यान जयसूर्यासारखी डाव्या हातानं बॉलिंग केली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरी टेस्ट २२ नोव्हेंबरपासून कोलकात्यात सुरू होत आहे. भारताची ही पहिलीच डे-नाईट टेस्ट मॅच असल्यामुळे या मॅचला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे. गुलाबी बॉलने ही टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. या टेस्ट मॅचआधीच अश्विनने कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात डावखुरी बॉलिंग करुन सराव केला.


२ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने १-०ने आघाडी घेतली आहे. इंदूरमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा एक डाव आणि १३० रननी विजय झाला. मयंक अग्रवालने २४३ रनची द्विशतकी खेळी केली, तर मोहम्मद शमीने पहिल्या इनिंगमध्ये ३ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ४ विकेट घेतल्या होत्या.