Asia Cup 2022: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्ही... अफगाणिस्तान कर्णधाराचा धक्कादायक खुलासा
India vs Afghanistan: अफगाणिस्तानाच कर्णधार मोहम्मद नबीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
India vs Afghanistan: एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) भारताने अफगाणिस्तानचा 101 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यानंतर भारताबरोबरच अफगाणिस्तानचाही या स्पर्धेता प्रवास संपला. पण या स्पर्धेत अफगाणिस्तानची कामगिरी दर्जेदार झाली. बलाढ्य संघांना त्यांनी चांगली लढत दिली. पण आता अफगाणिस्तान क्रिकेट संघाबद्दल (Afghanistan Cricket Team) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संघाचा कर्णधार मोहम्मद नबीनेच (Mohammad Nabi) याबाबत खुलासा केला आहे.
मोहम्मद नबीचा धक्कादायक खुलासा
एशिया कप स्पर्धेच्या सुपर 4 टप्प्यात चुरशीच्या लढतीत अफगाणिस्तानला पाकिस्तानविरुद्ध (Pakistan vs Afghanistan) पराभव पत्करावा लागला. हा सामना गाजला तो दोन्ही संघातील खेळाडूंच्या वादामुळे. या सामन्यानंतर अफगाणिस्तान संघाने तात्काळ मैदान सोडलं. याचं कारण होतं दुसऱ्याच दिवशी त्यांना भारताविरुद्ध खेळायचं होतं. हॉटेलमध्ये परतल्यावर अफगाणिस्तानच्या खेळाडूंना चक्क झोपेच्या गोळ्या घेऊन झोपावं लागलं. सामन्यापूर्वी चांगला आराम मिळावा हा यामागे उद्देश असल्याचं नबीने सांगितलं.
पण भारताविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीचं (Virat Kohli) शतक आणि भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) भेदक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा संघ ढेपाळला. भारताने अफगाणिस्तावर तब्बल 101 धावांनी मात केली.
श्रीलंका आणि बांगलादेशला केलं पराभूत
एशिया कप सुरु होण्यापूर्वी अफगाणिस्तान संघ सुपर 4 मध्ये पोहोचले अशी कोणी अपेक्षाही बाळगली नव्हती. पण मोहम्मद नबीच्या नेतृत्वात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. अफगाणिस्ताने श्रीलंका आणि बांगलादेशला पराभवाचा धक्का देत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं.