`आशिया कप जिंकण्यासाठी आहे, प्रयोगासाठी नाही`, दिग्गज खेळाडूने राहुल-द्रविडला घेतलं फैलावर!
भारताच्या या माजी दिग्गज खेळाडूने रोहित-द्रविडवर साधला निशाणा
Asia Cup 2022 : आशिया कपचा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या भारतीय संघाला सुपर 4 मधून बाहेर पडावं लागलं. भारताचा पाकिस्तान आणि श्रीलंकेने पराभव केला होता. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अशातच आशिया कपदरम्यान संघात केलेल्या प्रयोगावरून माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांनी टीम इंडियाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित करत रोहित आणि द्रविडवर निशाणा साधला आहे.
आशिया कप ही खूप मोठी स्पर्धा आहे. अशा स्पर्धेमध्ये मोठे सामने जिंकणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही सीरिजमध्ये असे प्रयोग करू शकता पण आशिया कप आणि विश्वचषक या स्पर्धा अशा प्रकारचे प्रयोग करण्यासाठी नसतात, असं दिलीप वेंगसरकर यांनी म्हटलं आहे.
टीम इंडिया प्रयोग करत पुढे चालली आहे. दिनेश कार्तिक, रविचंद्रन आश्विन यांन संघात घेतलं होतं. मात्र संघामध्ये त्यांना कायम स्थान दिलं नसल्याचं वेंगसकर म्हणाले. टीम इंडियाला आशिया कपमध्ये सुपर-4 टप्प्यात फक्त एकच सामना जिंकता आला.
पाकिस्तानने भारताचा 5 तर श्रीलंकेने 6 विकेट्सने पराभव केला. सलग दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया आशिया कप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडली. शेवटच्या सामन्यामध्ये भारताने अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव केला होता.