यूएई : आशिय कप स्पर्धेला (Asia Cup 2022) आजपासून (27 ऑगस्ट) सुरुवात होतेय. मात्र क्रिकेट चाहत्यांचं लक्ष टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या महामुकाबल्याकडे लागून राहिलंय. हा सामना रविवारी 28 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. रोहितला आपल्या कॅप्टन्सीत हा सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. (asia cup 2022 ind vs pak team india captain rohit sharma has been chances to level of virat kohli most matches win records)


कर्णधार म्हणून सर्वाधिक टी 20 विजय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियासाठी कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावे सर्वाधिक टी 20 सामने जिंकण्याच्या विक्रम आहे. रोहितकडे याच विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. रोहितने आतापर्यंत 35 टी 20 सामन्यात भारताचं नेतृत्व केलंय. यापैकी रोहितने 29 मॅचमध्ये टीम इंडियाला विजयी केलंय.


पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला, तर रोहित शर्माचा हा कर्णधार म्हणून 30 वा टी 20 विजय ठरेल. तसेच विराटच्या विक्रमाची बरोबरीही होईल.


विराटने 50 सामन्यात नेतृत्व केलं होतं. त्यापैकी 30 मॅचमध्ये विराटने प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं होतं. त्यामुळे आता रोहित पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकून विराटच्या विक्रमाची बरोबरी करणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.