Rohit Sharma Press Conference: बहुप्रतिक्षित आशिय कप स्पर्धेला (Asia Cup 2022) आजपासून (27 ऑगस्ट) सुरुवात झालीय. स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (SL vs AFG) यांच्यात खेळवण्यात येतोय. तर रविवारी 28 ऑगस्टला महामुकाबला खेळवण्यात येणार आहे. (asia cup 2022 ind vs pak team india captain rohit sharma press confernce dinesh karthik and playing eleven against pakistan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सामना होणार आहे. या सामन्यात 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात हा सामना रंगणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma)पत्रकार परिषद घेतली. रोहितने या दरम्यान प्लेइंग इलेव्हन आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) कामगिरीबाबतही प्रतिक्रिया दिली.


रोहित प्लेइंग 11 बाबत काय म्हणाला?


"आम्ही खेळपट्टी पाहिली आहे, त्यावर खूप गवत आहे. त्यामुळे सामन्याच्या दिवशी खेळपट्टी कशी आहे हे पहावं लागेल. त्यानुसार प्लेइंग-11 ठरवला जाईल. टॉस निर्णायक भूमिका बजावणार आहे. आजचा सामना बघू आणि मग त्याचा अंदाज घेऊ", अशी प्रतिक्रिया रोहितने दिली. 


दिनेश कार्तिकबाबत रोहितची प्रतिक्रिया


टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिक सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करतोय. दिनेशच्या स्पेशालिटी आपल्या सर्वांनाच माहितीय. दिनेशने टीमबाहेर असतानाही शानदार कामगिरी केलीय. त्यानं कमबॅकनंतरही चांगला खेळ दाखवलाय. त्याने सर्वांवरच आपली छाप सोडलीय. कार्तिक खेळणार की नाही, याबाबत मी काहीच बोलणार नाही, असं म्हणत रोहितने आवरतं घेतलं.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार अर्शदीप सिंह आणि आवेश खान.