दुबई : 2022 आशिया कप झाला असून आज क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाक असं युद्ध रंगणार आहे. आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी खूप मोठा आहे. दुबईमध्ये संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट टीम आमनेसामने असतील. याआधी जाणून घ्या, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते.


रोहित आणि राहुल करणार ओपनिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल आशिया कपमध्ये भारताच्या डावाची सुरुवात करतील. त्याचवेळी विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. कोहली फॉर्ममध्ये नसला तरी, तरीही त्याचं टीममध्ये असणं विरोधी टीमसाठी डोकेदुखी ठरेल. तो एकटाच आपल्या टीमला कधीही विजयापर्यंत नेऊ शकतो.


मिडिल ऑर्डर कशी असेल


पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर, ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर, हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर आणि दिनेश कार्तिक सातव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या फॉरमॅटच्या क्रमवारीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


या गोलंदाजांचा टीममध्ये समावेश


टीम इंडियाची गोलंदाजी पाहिली तर अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि लेगस्पिनर युजवेंद्र चहल स्पिन विभाग सांभाळतील. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी राहील. 


पाकिस्तानविरूद्ध भारताचं संभाव्य प्लेइंग इलेव्हन


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंह.