Asia Cup 2022 : संपूर्ण स्पर्धा बेंचवरच बसावं लागणार? या 5 खेळाडूंना मिळणार का टीम इंडियात संधी?
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियात बदल होणार? या खेळाडूंना संधी मिळणार?
Asia Cup: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाचं (Team India) 'मिशन एशिया कप' सुरु आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानाच पाच विकेटने पराभव केला. भारताचा आताचा संघ आणि कामगिरी बघता एशिया कप स्पर्धेच्या विजेतपदासाठी टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
टीम इंडियात सध्या अनेक स्टार खेळाडू आहेत. पण काही खेळाडू असेही आहेत ज्यांना एशिया कप स्पर्धेसाठी निवडलं पण अंतिम 11 मध्ये त्यांना संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
सूर्यकुमार यादव
यातला पहिला खेळाडू आहे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). एशिया कप स्पर्धेसाठी भारताच्या पंधरा खेळाडूंच्या यादीत सुर्यकुमार यादवला संधी देण्यात आली आहे. सुर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. पण असं असूनही त्याला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या आणि महत्त्वाच्या सामन्यात संधी देण्यात आली नाही.
रविचंद्रन अश्विन
भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज म्हणजे आर अश्विन (Ravichandra Ashwin). कसोटी सामन्यात आर अश्विन महत्त्वाची भूमिका बजावतो. पण टी-20 सामन्यात तो कितपत उपयुक्त ठरू शकतो याबाबत प्रश्न उपस्थित केला जातो. टी-20 क्रिकेटमध्ये अश्विनच्या आधी अष्टपैलू रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) पहिली पसंती दिली जाते.
ऋषभ पंत
भारताचा सध्याचा स्टार विकेटकिपर आणि फलंदाज म्हणजे ऋषभ पंत (Rishabh Pant). पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंतला संघाबाहेर ठेवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. काही दिग्गज खेळाडूंनीही रोहित शर्माच्या निर्णयावर टीका केली होती. एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात ऋषभ पंत एक उपयुक्त खेळाडू ठरु शकतो.
रवि बिश्नोई
युवा लेग स्पिनर रवी बिश्नोईने (Ravi Bishnoi) अगदी कमी कालावधीत आपल्या कामगिरीची छाप उमटवली आहे. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याने संधीचं सोनं केलंय. पण टीम इंडियात यजुवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा सारखे दिग्गज स्पिन गोलंदाज असल्याने अंतिम 11 मध्ये रवी बिश्नोईला संधी मिळणं फारच कठिण आहे.
दीपक हुड्डा
अनेक युवा खेळाडूंनी टीम इंडियात दमदार कामगिरी केली आहे. यापैकीच एक म्हणजे स्टार फलंदाज दीपक हुड्डा (Deepak Hudda). गेल्या काही सामन्यात दीपक हुड्डाने दमदार कामगिरी केली आहे. त्याची कामगिरी पाहता विराट कोहलीऐवजी फॉर्मात असलेल्या दीपक हुड्डाला संधी द्यावी असंही मत व्यक्त होत होतं. पण विराट कोहली टीम इंडियाचा स्टार खेळाडू आहे आणि त्याच्याऐवजी दीपक हुड्डाला संघात संधी मिळणं सध्या तरी शक्य नाही.