Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान `हाय व्होल्टेज` सामन्यावर पावसाचं संकट? क्रिकेट फॅन्सची होणार निराशा
खरंच पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार आहे का? काय आहे पावसाचा रिपोर्ट जाणून घ्या
युएई : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) महामुकाबला होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याची उत्सुकता लागली असताना क्रिकेट फॅन्ससाठी वाईट बातमी समोर आली आहे. या महामुकाबला सामन्यावर पावसाचे संकट असणार आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सची निराशा होणार आहे.
टीम इंडिया आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan) संघ वर्षभरानंतर आज पुन्हा आमने सामने येणार आहेत. 2021 च्या T20 विश्वचषकात दोन्ही संघ शेवटचा सामना खेळले होते. या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवत टीम इंडियाचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्याचा टीम इंडियासमोर (Team India) असणार आहे.
पावसाचे सावट
टीम इंडिया आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan) हाय व्होल्टेज सामन्यावर पावसाचे सावट आहे. मात्र पाऊस पडण्याची शक्यता फार कमी दिसतेय. त्यामुळे चाहत्यांसाठी ही दिलासादायक बाब असणार आहे. पाऊस पडणार नसला तरी जोरदार वारे वाहणार आहेत. त्याचबरोबर उन्हामुळे खेळाडूंना त्रास होऊ शकतो. सामन्याच्या दिवशी तापमान 40 ते 31 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी खेळाडूंनी मध्येच पाणी पिणे आवश्यक आहे.
टॉसची भूमिका महत्वाची
भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्यात टॉस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दुसऱ्या डावात दव पडेल, त्यामुळे बॅटींग करण अवघड जाणार आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला नेहमीच बॅटींग निवडायची असते. जेणेकरून दुसऱ्या डावात दव पडण्याचा फायदा घेऊन प्रतिस्पर्धी संघाला ऑलआऊट करता येईल. तसं पाहायला गेलं तर दुबईची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. या खेळपट्टीवर 170 पर्यंतच्या धावसंख्येचा सहज पाठलाग करता येतो.
या हाय व्होल्टेज सामन्याला अवघे तास उरले आहे. तसचे या सामन्याची क्रिकेट फॅन्सला मोठी उत्सुकता लागलीय.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंह.