IND vs PAK  : आशिया कपमधील (Asia Cup 2022) हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तान संघाने 147 धावा केल्या आहेत. भारतासमोर 148 धावांचं आव्हान असणार आहे. पाकिस्तानकडूव मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. यामध्ये त्याचं अर्धशतक हुकलं आहे. भारताच्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. भुवनेश्वरने सर्वाधिक 4 गडी तर हार्दिकने 3 गडी बाद केले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. फंलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरूवात खराब झाली. कर्णधार बाबर आझमला 10 धावांवर भुवनेश्वर कुमारने बाद केलं. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या फखर जमानने चौकार मारत सुरूवात केली होती मात्र त्यालाही युवा गोलंदाज आवेश खानने 10 धावांवर झेलबाद केलं. इफ्तिखार अहम आणि खुशदिल शाह आणि एक बाजू लावून धरलेल्या मोहम्मद रिझवान यांना अष्टपैलू हार्दिक पांड्याने बाद केलं.


शाहनवाज दहनी आणि  हरिस रौफ यांनी शेवटला येत छोटेखानी खेळी करत पाकिस्तानला 147 धावांचा पल्ला गाठून दिला. भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला जास्त वेळ तग धरता आला नाही.  भारतीय फलंदाजांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.