मुंबई : आशिया कपच्या (Asia Cup 2022) सुपर 4 मध्ये पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आता भारताचा पुढील सामना श्रीलंका (India vs Sri Lanka) संघाशी होणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरो असा असणार आहे. कारण हा सामना जिंकल्यास भारताच्या अंतिम फेरी गाठण्याच्या आशा कायम राहतील. दरम्यान या सामन्यासाठी भारताची (Team India)  प्लेईंग XI कशी असणार आहे ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कपच्या (Asia Cup 2022) सुपर 4 मधील पहिला सामना श्रीलंकेने जिंकला तर भारताचा पराभव झाला. तर भारताला अंतिम फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे. श्रीलंकेविरुद्धचा (Sri Lanka)  सामना भारतासाठी करा किंवा मरो असा असणार आहे. या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल आवश्यक असणार आहेत. त्यामुळे टीम आपल्या सर्वोत्कृष्ट टीमसह मैदानात उतरेल, अशी अपेक्षा आहे. 


बॅटींगचा क्रम
बॅटींगबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल डावाची सुरुवात करताना दिसतील. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी उतरतील. पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आणि त्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्यास दिनेश कार्तिक फिनिशर म्हणून खेळेल.


बॉलर्स 
श्रीलंकेविरुद्धच्या Sri Lanka)  सामन्यात युझवेंद्र चहलला संधी दिली जाऊ शकते. रवींद्र जडेजा जखमी झाल्याने स्टँडबाय अक्षर पटेलला मुख्य संघात स्थान देण्यात येईल.  ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. रवी बिश्नोईने चांगली गोलंदाजी केली आणि तो अक्षरसह श्रीलंकेच्या संघाला अडचणीत आणू शकतो.वेगवान गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्ध दिसणार आहेत. स्पिनमध्ये रवी बिश्नोईसोबत अक्षर पटेल दिसणार आहे.


टीम इंडियाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत किंवा दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), दीपक हुडा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल किंवा अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.