मुंबई : आशिया कप 2022 ला (Asia Cup 2022)  आजपासून सुरुवात होत आहे.आज पहिला सामना हा श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तानमध्ये रंगणार आहे. यानंतर उद्या रविवारी हायव्होल्टेज सामना भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार आहे. या सामन्याची चाहत्यांना उत्सुकता लागलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कपवर (Asia Cup 2022) नाव कोरण्यासाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. यासाठी प्रत्येक संघ मैदानात घाम गाळताना दिसतोय. यावेळी प्रॅक्टीस दरम्यान अनेक खेळाडूंची प्रतिस्पर्ध्यांची भेटही होत आहे. यामध्ये दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांची आपुलकीने विचारपूस करताना दिसतायत. एकूणच काय तर दोन्ही संघातील खेळाडूंमधले मैत्रिपूर्ण संबंध दिसून येतायत. असाच मैत्रिपूर्ण संबंधाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो क्रिकेट फॅन्सला आवडला आहे. 


'मी मानसिकदृष्ट्या...',मेंटल हेल्थवर Virat Kohli चं मोठ विधान


फोटोत काय ? 


या फोटोमध्ये दोन संघ एकत्र नमाज पडताना दिसत आहे. हे दोन संघ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहेत. या दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर प्रॅक्टीस करत होते. या दरम्यानचं नमाजाची वेळ झाली. यावेळी मैदानावर असलेल्या दोन्ही संघाची खेळाडूंने एकत्र उभे राहात नमाज पठण केले. फोटोत आपण पाहू शकता बूट काढून हे खेळाडू एकत्र उभे राहत नमाज पठण करताना दिसत आहे.  


दरम्यान दोन्ही संघ वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधित्व करत असले तरी, मैदानातील नमाजाच्या वेळेस एकत्र आले आहेत. त्यामुळे धर्मासाठी व नमाजासाठी पाकिस्तान-अफगाणिस्तानचे खेळाडू एकत्र आलेले पाहून क्रिकेट वर्तुळात या दोन्ही संघाची चर्चा सुरु झाली आहे. त्याचबरोबर या खेळाडूंच्या नमाजाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोची सर्वत्र एकच चर्चा आहे. 



दरम्यान अफगाणिस्तानचा आशिया कपमधील पहिला सामना आज श्रीलंकेविरूद्ध रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 ला या सामन्याची सुरुवात होणार आहे. तर पाकिस्तानचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडिया विरूद्ध असणार आहे. या हायव्होल्टेज सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागलीय.