Asia Cup:रवींद्र जडेजाच्या जागी `या` खेळाडूची एन्ट्री;कोच द्रविड केलं स्पष्ट...
त्याच्याकडे चार ओव्हर टाकण्याची आणि बॅटिंग करण्याची क्षमता आहे. तसाच टी-20 सामन्यांमध्येही ऑफ-स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
Asia Cup 2022: रविवार क्रिकेटप्रेमींसाठी खूप खास आहे. कारण आज Asia Cup 2022 मध्ये भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर पडल्याने भारतीय संघात त्याची जागा कोण घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. Asia Cup 2022मध्ये आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. टीम इंडियाने पहिला सामना पाकिस्तान आणि नंतर हाँगकाँगविरुद्ध जिंकला. आता सुपर-4 सामन्यात भारताचा पुन्हा एकदा पाकिस्तानशी दोनहात करणार आहे. (Asia Cup 2022 Ravindra Jadeja replaces this player and coach Dravid hints)
जडेजाची जागा कोण घेणार?
टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये रवींद्र जडेजाच्या जागी अष्टपैलू खेळाडूला स्थान दिले जाईल यावर सस्पेन्स कायम आहे. जडेजाच्या जागी अक्षर पटेल (Axar patel), दीपक हुडा (Deepak Hooda) किंवा रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यापैकी एकाची निवड होऊ शकते. जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया चषक आणि T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये या स्टार खेळाडूची अनुपस्थिती टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. जडेजाची अनुपस्थिती कोणताही खेळाडू सहजासहजी भरून काढू शकणार नाही.
कोच द्रविडने केलं स्पष्ट
मात्र, प्रशिक्षक द्रविडने प्लेइंग 11 मध्ये जडेजाच्या जागी एका खेळाडूची निवड केली आहे.'रविचंद्रन अश्विनसारखा खेळाडू संघात असणे खूप छान आहे, त्याच्याकडे चार ओव्हर टाकण्याची आणि बॅटिंग करण्याची क्षमता आहे. तसाच टी-20 सामन्यांमध्येही ऑफ-स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. बांगलादेश आणि श्रीलंकासारख्या संघांकडे उत्कृष्ट ऑफस्पिनर्स आहेत. जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही त्यांचा वापर करू शकतो. द्रविडकडून मिळालेल्या या संकेतामुळे रवींद्र जडेजाच्या जागी संघात स्थान मिळवण्यासाठी अश्विनच प्रबळ दावेदार असल्याचं दिसतं आहे.
दीपक हुडादेखील दावेदार
रवींद्र जडेजाच्या जागी दीपक हुडाला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकतं. दीपक हुडा फलंदाजीसोबत गोलंदाजीही करू शकतो. टीम इंडियासाठी दीपक हुडाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड खूप चांगला राहिला आहे, तर विशेष म्हणजे तो टीम इंडियासाठी आतापर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये टीमने विजय मिळवला आहे.