Asia Cup 2022 : आशिया कप 2022 सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. यूएईमध्ये होणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेत गतविजेता भारत यंदाही विजयाची पंरपरा सुरु ठेवण्यासाठी उतरेल. भारताने 2016 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या (MS dhoni) नेतृत्वाखाली टी-20 फॉर्मेटमध्ये विजेतेपदावर कब्जा केला होता, तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2020 मध्ये एकदिवसीय फॉर्मेट जिंकला होता. अशा स्थितीत रोहितला (Rohit sharma) त्याच्या नेतृत्वाखाली प्रथमच टी-20 विजेतेपद मिळवायचे आहे. (Most Runs in asia cup)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे भारताने आतापर्यंत सात वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. एकीकडे रोहित शर्माची नजर टीम इंडियाला 8व्यांदा चॅम्पियन बनवण्यावर असेल, तर दुसरीकडे तो सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) एक मोठा विक्रम मोडण्याचा प्रयत्न करेल. आगामी आशिया चषक स्पर्धेत रोहितने आणखी 89 धावा केल्या तर तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तसेच सचिनला मागे टाकत या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल.


सचिनने या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या 23 सामन्यांच्या 21 डावांमध्ये 51.10 च्या सरासरीने 971 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने 27 सामन्यांच्या 26 डावांमध्ये 42.04 च्या सरासरीने 883 धावा केल्या आहेत. म्हणजेच सचिन आणि रोहितमध्ये केवळ 88 धावांचे अंतर आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने या स्पर्धेत आतापर्यंत 16 सामन्यांत 63.83 च्या प्रभावी सरासरीने 766 धावा केल्या आहेत.


आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज


971 - सचिन तेंडुलकर
883 - रोहित शर्मा
766 - विराट कोहली
690 - एमएस धोनी


आशिया चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाबाबत बोलायचे झाले तर हा विक्रम श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. या स्पर्धेत त्याने 25 सामन्यात 1220 धावा केल्या आहेत, श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा 1075 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत सचिन तिसऱ्या क्रमांकावर आहे.


आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू


1220 - सनथ जयसूर्या
1075 - कुमार संगकारा
971 - सचिन तेंडुलकर
907 - शोएब मलिक
883 - रोहित शर्मा