Women Asia cup 2022 celebration : भारतीय महिला संघाने सातव्यांदा आशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाचा 8 विकेट आणि 69 बॉल राखून विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारताच्या महिला संघाने जोरदार सेलिब्रेशन केलं आहे. यावेळी स्टार खेळाडूने चक्क झोपून डान्स केला असून तो डान्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडिओमध्ये, सर्व संघ उभा असलेला दिसत आहे, त्यानंतर सगळ्या खेळाडू कॅमेराकडे पाहतात आणि डान्स करू लागतात. जेमिमा रॉड्रिग्ज ही मैदानावर झोपलेली दिसत आहे. जेमिमा व्हॉट्सअपमधील GIF सारखी स्टेप्स करत आहे. अनेक नेटकऱ्यांनी ही गोष्ट ओळखली. 



जेमिमा रॉड्रिग्जच्या अंगावर सर्व खेळाडू सेलिब्रेशनवेळी उडवलेलं तिच्या अंगावर टाकताना दिसत आहे. उपकर्णधार स्मृती मंधना जेमिमाच्या तोंडावर जाते तेव्हा ती स्मृतीच्या मागे धावत जाताना दिसते. बीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 


आशिया कपच्या (Asia Cup) फायनल सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियासमोर (India vs Sri Lanka) 65 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने (Team India  सहज पुर्ण करत अंतिम सामना जिंकलाय. स्मृती मंधनाने सर्वाधिक 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत तिने 6 फोर आणि 3 सिक्स मारले होते. या धावांच्या बळावर टीम इंडियाने श्रीलंकेवर 8 विकेट आणि 69 बॉल राखून सहज विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयाच्या शिल्पकार स्मृती मंधना ठरलीय.