मुंबई :  आशियाई क्रिकेट परिषदेने (Asian Cricket Council) आशिया कप स्पर्धेची (Asia Cup 2022) घोषणा केली आहे. आशिया कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा श्रीलंकेला मिळालाय. या बहुप्रतिक्षित स्पर्धेचं आयोजन हे  27 ऑग्स्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान केलं गेलं आहे. तर बाद फेरीतील सामन्यांना 20 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. (asia cup 2022 t 20 format indian vs pakistan match rohit sharma babar azam)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे ही स्पर्धा यंदा 20 ओव्हरची असणार आहे. यामुळे आगामी टी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या 20 वर्ल्ड कपच्या  (ICC Mens T20 World Cup 2022)  दृष्टीने इतर संघांना कसून सराव करता येईल. 


या स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. तर सहावा संघ कोण असणार हे क्वालिफायकर सामन्याच्या निकालावर ठरणार आहे.  


टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 7 वेळा आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 2016 आणि 2018 मध्ये सलग आशिया कप जिंकला होता.  त्यामुळे यावेळेस टीम इंडियाचं हॅट्रिकसह आठव्यांदा आशिया कप जिंकण्याचं मानस असणार आहे.