मुंबई : आशिया कपला (Asia Cup 2022) आजपासून सुरुवात होत आहे. या कपमध्ये रविवारी टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (india vs pakistan) हायव्होल्टेस सामना रंगणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता लागलीय. या सामन्यापूर्वीचं टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) मानसिक आरोग्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट एकूण चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यातचं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीने  (Virat Kohli)  त्याच्या मानसिक आरोग्याबाबत प्रथमचं भाष्य केले होते. यामध्ये त्याने म्हटले होते की, माणसांनी भरलेल्या खोलीत त्याला एकटे वाटले होते. यानंतर त्यांच्या मेंटल हेल्थबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. यानंतर आता पुन्हा एकदा मेंटल हेल्थवर तो स्पष्टच बोललाय. तो नेमकं काय बोललाय, ते जाणून घेऊयात.  


Asia Cup 2022 : मैदानात कट्टर प्रतिस्पर्धी, मात्र 'या' गोष्टीसाठी एकत्र दोन्ही संघाचे खेळाडू


काय म्हणाला विराट? 
विराटने  (Virat Kohli)  नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, 'मी मानसिकदृष्ट्या कमकुवत होतो हे मान्य करायला मला लाज वाटत नाही.बरं हे वाटणं अगदी सामान्य आहे, पण आपण त्याबद्दल बोलत नाही. कारण आपल्याला लाज वाटते. लोकांनी आमच्याकडे तसं पाहावं असं आम्हाला वाटत नाही, असे तो म्हणालाय. माझ्यावर विश्वास ठेवा, मजबूत असल्याचं ढोंग करणे दुर्बल असल्याचे कबूल करण्यापेक्षा वाईट असल्याचे तो येथे नमुद करतोय. 


कोहली (Virat Kohli)  पुढे म्हणाला, 'मानसिकदृष्ट्या खूप मजबूत म्हणून माझी ओळख आहे आणि मी त्याप्रमाणे आहेच. पण प्रत्येकाला एक मर्यादा असते आणि ती मर्यादा ओळखायला हवी. अन्यथा तुमच्या आरोग्यासाठी काही गोष्टी वाईट होऊ लागतात,असे त्यांनी सांगितले. मेंटल हेल्थवरील त्याचं हे विधान एकून अनेकांना धक्का बसलाय.  



दरम्यान आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मधील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी विराट कोहलीची (Virat Kohli) स्टार स्पोर्ट्स सोबत एक मुलाखत झाली. ही मुलाखत आज सायंकाळी प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीत त्याने विविध प्रश्नांवर उत्तर दिली आहेत.