Asia Cup 2023 Team India: येत्या 30 ऑगस्टपासून आशिया कपला ( Asia Cup 2023 ) सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया तयार करत असून 17 सप्टेंबर रोजी याचा फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. यावेळी हायब्रिड मॉडल ( Hybrid Model ) वर खेळवला जाईल. या सिरीजमध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा एकमेंकाशी भिडणार आहे. मात्र आशिया कप सुरु होण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. 


आशिया कपपूर्वी टीम इंडिया बसला मोठा धक्का


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला लागलेल्या दुखापतींचं ग्रहण काही संपण्याचं नाव घेत नाहीये. दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे टीम इंडियाची चिंता वाढणार आहे. क्रिकेट वेबसाईट क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोन स्टार खेळाडू अजून फीट नसल्याने टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरचं टेन्शन वाढणार आहे. या खेळाडूंसाठी आशिया कप 2023 मध्ये खेळणे कठीण मानलं जातंय. 


सूत्रांनी दिली धक्कादायक माहिती


बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, "राहुल आणि श्रेयस हे दोन्ही खेळाडू 50 ओव्हर्सच्या क्रिकेटसाठी फीट असण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय श्रीलंकेच्या दमट परिस्थितीत त्यांच्या फीटनेसची शक्यता नाही."


बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या म्हणण्यानुसार, आगामी वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या सिरीजपूर्वी राहुल किमान फीट होऊ शकतो.


केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोन्ही खेळाडू टीम इंडियाचे सर्वात मोठे मॅचविनर मानले जातात. हे दोन्ही खेळाडू आशिया कपमध्ये खेळले नाहीत तर टीम इंडियाची चिंता वाढण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरला आयपीएल 2023 पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या गेलेल्या टेस्ट सिरीजमध्ये दुखापत झाली होती. तर केएल राहुलला आयपीएलदरम्यान दुखापत झाली.


आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक :


  • पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - 30 ऑगस्ट

  • बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - 31 ऑगस्ट

  • भारत विरुद्ध पाकिस्तान - 2 सप्टेंबर

  • बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - 3 सप्टेंबर

  • भारत विरुद्ध नेपाळ - 4 सप्टेंबर

  • श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - 5 सप्टेंबर


सुपर-4 चे सामने कसे होतील?


  • A1 वि B2 - 6 सप्टेंबर

  • B1 वि B2 - 9 सप्टेंबर

  • A1 वि A2 - 10 सप्टेंबर

  • A2 वि B1 - 12 सप्टेंबर

  • A1 वि B1 - 14 सप्टेंबर

  • A2 वि B2 - 15 सप्टेंबर

  • फायनल सामना - 17 सप्टेंबर