Video: इशानला Out केल्यानंतरची `ती` कृती हारिस रौफला महागात पडली; पंड्याने उतरवला माज
Haris Rauf After Ishan Kishan Wicket Hardik Pandya Replied In Style: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये इशान किशन आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सावरला. दोघांनाही शतक झळकावता आलं नाही पण त्यांनी केलेल्या 138 धावांच्या पार्टनरशीपमुळे भारताला समाधानकारक धावसंख्या गाठता आली.
Haris Rauf After Ishan Kishan Wicket Hardik Pandya Replied In Style: आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये ज्या गोष्टीची भिती होती अखेर तेच घडलं. हा सामना पावसामुळे कमी षटकांचा होईल किंवा रद्द करावा लागेल अशी शंका व्यक्त केली जात होती आणि खरंच तेच घडलं. मात्र सामन्यातील एकच डावाचा खेळ झाला तरी त्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये असणारं कट्टर वैर दिसून आलं. यामध्ये पाकिस्तानी गोलंदाजांची आक्रमकता तर त्याला त्याचपद्धतीने भारतीय फलंदाजांनी खास करुन इशान किशन आणि हार्दिक पंड्याने दिलेली उत्तरं असा अनोखा सामना या सामन्यादरन्यान पहायला मिळालं.
इशान आणि हार्दिकने डाव सावरला
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानचा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने भारतीय सलामीवीरांना एकामागोमाग एक तंबूत पाठवलं. त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर हारिस रौफ भारतीय फलंदाजांवर तुटून पडला. त्याच्या वेगवान गोलंदाजीसमोर सुरुवातीला भारतीय फलंदाज गोंधळून गेले. भारताची धावसंख्या एका वेळी 66 वर 4 बाद अशी होती. मात्र यानंतर हार्दिक पंड्या आणि इशान किशनने भारतीय डाव सावरला आणि त्याला आकार दिला. दोघांनी अप्रतिम फटकेबाजी करत भारताचा घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणली.
हारिस रौफने नेमकं काय केलं
इशान किशननेही उत्तम फलंदाजी केली. मात्र काही धावांनी त्याचं शतक हुकलं. इशान किशनने 9 चौकार आणि 2 षटकांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली. हारिस रौफने इशानला बाद केलं. मात्र इशानला बाद केल्यानंतर हारिस रौफला चांगलाच चेव आला. भारतीय संघ फलंदाजी करत असताना 38 व्या ओव्हरला हारिस रौफने इशानला बाद केलं. त्यानंतर त्याने आक्रमक पद्धतीने इशानला पव्हेलियन कुठे आहे हे हाताने इशारा करुन आरडाओरड करत सांगितलं. पाकिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाने बाबर आझमने इशानचा झेल पकडल्यानंतर भारताच्या विकेटकीपरकडे पाहत संतापून हाताने इशारा करत त्याला मैदानातून बाहेर जाम्यास सांगितलं. यावर इशानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र हा सारा प्रकार इशानबरोबर पाचव्या विकेटसाठी विक्रमी पार्टनरशीप करणारा हार्दिक पंड्याने पाहत होता. हार्दिकने पुढल्याच ओव्हरला हारिस रौफला धडा शिकवला. आधी हारिस रौफने नेमकं काय केलं ते पाहूयात..
हार्दिकने दाखवला इंगा
38 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर इशान बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा फलंदाजीला आला. सामन्यातील 40 वी ओव्हरही हारिस रौफनेच टाकली. आधीच्या ओव्हरमध्ये इशानला बाद केल्यानंतर हारिस रौफने केलेला अगाऊपणा पंड्याच्या चांगलाच लक्षात होता. पंड्याने हारिस रौफच्या या ओव्हरच्या पहिल्या तिन्ही चेंडूंवर चौकार लगावले. चौकारांची हॅटट्रीक झळकावत पंड्याने हारिस रौफला जशास तसं उत्तर दिलं. हार्दिकने सलग 3 चौकार मारल्याने हारिस रौफची लय बिघडली. यासंदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
1)
2)
138 धावांची पार्टरनशीप
इशान किशन आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सावरत त्याला आकार दिला. या दोघांच्या संयमी आणि उत्तरार्धातील आक्रमक खेळीमुळे भारताला सामन्यात 266 धावांपर्यंत मजल मारता आली. हार्दिकने 90 चेंडूंमध्ये 87 धावा केल्या. हार्दिकच्या खेळीत 7 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. इशानला बाद केल्यानंतर डिवचणाऱ्या हारिस रौफला पंड्याने लगावलेले हे 3 चौकार खालील व्हिडीओत पाहा...
इशान आणि हार्दिकने 138 धावांची पार्टरनशीप केली.