Asia Cup 2023 India vs Pakistan : सप्टेंबर 2023 मध्ये होणारी आशिया चषक भारत-पाकिस्तान (Asia Cup 2023 India vs Pakistan) हा सामना कोणत्या शहरात होणाक याबाबत संभ्रम कायम आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आयसीसी (icc) आणि आशिया कप स्पर्धेत आमने-सामने येतात. आशिया कपच्या आयोजनावरुन गेल्या सहा महिन्यांपासून वाद सुरू होता. आम्ही पाकिस्तानात जाणार नाही, अशी भूमिका बीसीसीआय (bcci) सचिव आणि आशियाई क्रिकेट समितीचे अध्यक्ष जय शाह यांनी घेतली होती. तर भारतीय संघ पाकिस्तानात आली नाही, तर आम्हीही आगामी एकदिवसीय वर्ल्डकपसाठी भारतात जाणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली होती. मात्र यावर पाकिस्तान आणि बीसीसीआय या दोन्ही क्रिकेट बोर्डाचे एकमत झाल्याचे समजतंय. 


आशिया चषकाबाबत एक अहवाल समोर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाचे आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानच करणार आहे. मात्र भारत पाकिस्तान खेळणार आहे. याचदरम्यान या सामन्यासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. यावर्षी होणार्‍या आशिया चषक (Asia Cup 2023 India vs Pakistan) आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील परिस्थितीबाबत बराच गोंधळ वाढला आहे. दोन्ही प्रकरणांबाबत वेगवेगळे अहवाल समोर येत आहेत. आशिया चषकाबाबत एक अहवाल समोर आला असून ज्यामध्ये संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर भारतीय संघ आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळणार आहे.


पाकिस्तान वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाही?


तर काही रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की, संपूर्ण आशिया कप स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर तटस्थ ठिकाणी होणार आहे. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबतही असेच काही अहवाल येत आहेत. नुकताच एक रिपोर्ट समोर आला होता. ज्यामध्ये पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नसल्याचे सांगण्यात आले होते. तर पाकिस्तान संघ विश्वचषकातील आपले सर्व सामने तटस्थ ठिकाणी म्हणजेच बांगलादेशमध्ये खेळणार आहे. भारतीय संघाने आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यामुळे हे सर्व केले जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे.


तर दुसरीकडे वेगळाच अहवाल समोर आला. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विश्वचषक भारतातच होणार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान संघही येथे आपले सामने खेळणार आहे. हा रिपोर्ट क्रिकबझचा असून ज्यामध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचे ठिकाण सांगण्यात आले आहे.


भारत-पाकिस्तान स्पर्धा येथे होऊ शकते


दरम्यान BCCI ने विश्वचषकाअंतर्गत होणाऱ्या 48 सामन्यांसाठी 12 ठिकाणे निवडली आहेत. प्रत्येक ठिकाणी 4 सामने आयोजित केले जाऊ शकतात. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होऊ शकतो. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दिल्ली किंवा चेन्नईमध्ये घेण्याचे निश्चित झाले आहे. जरी अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. वेळापत्रकाची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे.


अहवालानुसार, विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या 12 ठिकाणांमध्ये अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, मुंबई, राजकोट, गुवाहाटी, इंदूर, कोलकाता, बेंगळुरू, धर्मशाला, हैदराबाद आणि लखनौ आहेत. अंतिम फेरी अहमदाबादमध्ये आणि उपांत्य फेरी मुंबईत होऊ शकते. दुसरा उपांत्य सामना कुठे होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.