Asia Cup Final 2022 : आशिया कपचा फायनल सामना पाकिस्तान आणि श्रालंकेमध्ये रंगणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. श्रीलंका 8 वर्षांपासून तर पाकिस्तान 10 वर्षांपासून आशियाचा 'बादशाह' होण्याची वाट पाहत आहे. दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड पाहिले तर पाकिस्तानचं पारडं जड आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-20 मध्ये आतापर्यंत पाकिस्तान आणि श्रीलंका 22 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये पाकिस्तानने 13 वेळा विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने 9 मॅच जिंकल्या आहेत. मात्र रेकॉर्डनुसार पाकिस्तानचं पारडं जरी जड जात असलं तरी श्रीलंकेने सुपर 4 च्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता. 


आयसीसी क्रमवारीमध्ये 8 व्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेच्या संघाला हलक्यामध्ये घेण्याची चूक बाबर आझमचा संघ करणार नाही.  सध्याच्या स्पर्धेत दोन्ही संघ गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. श्रीलंकेने सुपर फोर फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाचं मनोबल उंचावलं आहे.


दुबईत झालेल्या अनेक सामने पाहिल्यास असे दिसेल की, टॉस जिंकणारा संघच बॉस आहे. टॉस जिंकणारा संघ प्रथम बॉलिंग निवडतो आणि नंतर सहज सामना जिंकतो. गेल्या 22 सामन्यांमध्ये 19 वेळा प्रथम बॉलिंग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.अशा परिस्थितीत, हे स्पष्ट होत आहे की,  सामन्याच्या पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच आशिया चषक 2022 ची ट्रॉफी कोणता संघ उंचावणार आहे, हे जवळपास निश्चित होणार आहे.


पिच रिपोर्ट
दुबईच्या खेळपट्टीवर नेहमीप्रमाणे प्रथम बॉलिंग करणारा संघ फायद्यात असेल. येथे वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला स्विंग मिळू शकते. फिरकीपटूंनाही चांगला स्विंग मिळण्याची शक्यता आहे. ही विकेट दुसऱ्या डावात फलंदाजांना उपयुक्त ठरेल. सध्या, रात्री येथे दव फारसा प्रभाव पडत नाही, त्यामुळे गोलंदाजी संघाला नंतर फारसा त्रास होत नाही. पण असे असूनही, या विकेटवर पाठलाग करणाऱ्या संघाला बहुतांश प्रसंगी सहज विजय मिळाला आहे.