दुबई : आशिया कप 2022  (Asia Cup 2022) मध्ये आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी जाणून घेऊयात हेड टू हेड सामन्यात भारत की पाकिस्तान कोणत्या संघाचा दबदबा असणार आहे.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) हाय व्होल्टेज सामन्यासाठी प्रेक्षक सज्ज झाले आहेत. कधी एकदा सामना रंगतोय याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलीय. दरम्यान आतापर्यंत अनेकदा भारत पाकिस्तान संघ आमने सामने आले आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणत्या संघाने सर्वाधिक सामने जिंकले असा सवाल नेहमी उपस्थित होत असतो. या संदर्भातील उत्तर या आकडेवारीत पाहूयात.  


पाहा आकडेवारी:
आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan in Asia Cup) 14 वेळा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. यातील भारताने 8 आणि पाकिस्तानने 5 वेळा विजय मिळवला आहे.


भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 9 वेळा टी-20 सामना झाला आहे. यापैकी भारताने 6 आणि पाकिस्तानने 2 वेळा विजय मिळवला आहे, तर एक सामना रद्द झाला आहे.


आकडेवारीनुसार आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) 14 वेळा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. यावेळी भारतीय संघाचंच पारडं जड असल्याचं दिसून आलं आहे. भारताने पाकिस्तानला या 14 पैकी 8 सामन्यांत धुळ चारली आहे. तर पाकिस्तान देखील 5 सामने जिंकण्यात यशस्वी राहिला आहे. 


दरम्यान भारताने 7 वेळा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. तर पाकिस्तानच्या संघाने दोनदा विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे भारताला आठव्यांदा आणि पाकिस्तानला तिसऱ्यांदा आशिया कपवर नाव कोरण्याची संधी आहे. 


संभाव्य संघ 


भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान, दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल


पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.