Sport News : भारत आणि पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना (IND vs PAK) 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानला शाहीन आफ्रिदीच्या रूपाने मोठा झटका बसला आहे, कारण तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे भारताचा जसप्रीत बुमराहसुद्धा सामन्याला मुकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहीन नसल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली आहे. मात्र 'ओ भाई मारो मुझे..' प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानच्या मोमीन साकिबने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो शाहीन बाहेर असताना मजा करताना दिसत आहे. भारताविरुद्ध खेळण्याची तयारी सुरू केली आहे.


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मोमीन सामन्याचा सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती येऊन विचारते की, मोमीन भाई काय करत आहेस?, यावर मोमीन म्हणतो, 'मी तयारी करत आहे. शाहीन दुखापतीमुळे आशिया कप खेळत नाहीये,  जर माझ्या संघाला माझी गरज असेल तर मी स्वतः मैदानात जाऊन एक नाही, दोन नव्हे, तीन-तीन शतके ठोकतो.


गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यांमध्ये शाहीन आफ्रिदीच्या धारदार गोलंदाजीने भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरचे कंबरडे मोडलं होतं. कारण त्याने भारताचे आघाडीचे खेळाडू के. एल. राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाद केलं होतं. पाकिस्तानने तो सामना 10 विकेट्सने जिंकला होता.