Asia Cup: क्रिकेट चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे ती या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या एशिया कप स्पर्धेची. येत्या 27 तारखेपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाचा पहिला सामना 28 ऑगस्टला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan0 होणार आहे. टी-20 वर्ल्ड कप (T-20 World Cup) स्पर्धेतल्या पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशानेच टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. पण या मोठ्या स्पर्धेसाठी संघातील काही खेळाडूंना वेटिंगवरच रहावं लागण्याची शक्यता आहे. 


रवि बिश्नोई
एशिया कप स्पर्धेसाठी भारताच्या 15 खेळाडूंचा संघ जाहीर झाला आहे. यात युवा स्पिन गोलंदाज रवी बिश्नोईला (Ravo Bishnoi) संधी देण्यात आली आहे. पण रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि यजुवेंद्र चहल (yuzvendra chahal) हे प्रमुख स्पीन गोलंदाज संघात आहेत. शिवाय अनुभवी दिग्गज स्पिन गोलंदाज आर अश्विनलाही (R Ashwin) संधी देण्यात आली आहे. 


अशात रवी बिश्नोईला अंतिम अकरामध्ये कितपत संधी मिळेल याबाबत प्रश्नचिन्ह आहे. नुकत्याच झालेल्या वेस्टइंडिजविरुद्धच्या मालिकेत बिश्नोईने दमदार कामगिरी केली होती. पण संघात दिग्गज स्पिन गोलंदाज असल्याने बिश्नोईला संपूर्ण स्पर्धा बेंचवर बसूनच काढावी लागणार आहे असं दिसतंय.


आवेश खान
भारतीय संघातील दुसरा खेळाडू आहे वेगवान गोलंदाज आवेश खान (avesh khan). जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आणि मोहम्मद शमी (mohammed shami) यांच्या गैरहजेरीत आवेश खानला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी मिळण्याची शक्यता होती. पण वेस्टइंडिविरुद्धच्या मालिकेत आवेशची कामगिरी सुमार झाली आहे. आशिया कप स्पर्धेसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये भुवनेश्वर कुमारबरोबर युवा अर्शदीप सिंहला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. तर हार्दिक पांड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची जागा भरुन काढेल. त्यामुळे आवेश खानला स्पर्धेत कितपत संधी मिळेल याबाबत प्रश्न आहे.  


एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, आवेश खान, दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवि बिश्नोई