Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे आणि सकाळीच भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. या स्पर्धेत भारतानं पहिलं सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावलं आहे. ठाण्याच्या मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलने (Rudransh Patil) आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. 10 मीटर एअर रायफल (10m rifle shooting) क्वालिफायरमध्ये दिव्यांश पनवार, रुद्राक्ष पाटील आणि ऐश्वर्या प्रताप सिंग यांनी देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. या जोडीने कोरिया आणि चीनला हरवून हे पदक जिंकले आहे. भारतीय टीमने 1893.7 गुणांसह विश्वविक्रम केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमबाजीतील पहिले सुवर्ण


चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. सोमवारी पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताने हे सुवर्णपदक जिंकले. रुद्राक्ष पाटील, ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर आणि दिव्यांश या त्रिकूटाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताने सुवर्णपदक जिंकले. रुद्राक्ष पाटील, ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर आणि दिव्यांश पनवार यांनी 1893.7 गुण मिळवले आणि अव्वल स्थान पटकावले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रुद्रांश पाटीलने 632.5 गुण मिळवत मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे रुद्रांश इतर दोन भारतीय खेळाडूंच्या पेक्षाही अव्वल ठरला आहे.


यानंतर लगेचच रोइंगमध्ये भारताला कांस्यपदक मिळाले आहे. जसविंदर, आशिष, पुनीत आणि आशिष यांनी पुरुषांच्या 4 रोइंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. मात्र बलराज पनवारचे रोईंगमधील पदक हुकले. बलराजने पुरुष एकेरी स्कल्सच्या अंतिम फेरीत चौथे स्थान पटकावले. या स्पर्धेत चीनने सुवर्ण, जपानने रौप्य आणि हाँगकाँगने कांस्यपदक जिंकले.


पहिल्या दिवशी 5 पदके 


भारताने या स्पर्धेमध्ये दमदार सुरुवात करत रविवारी पहिल्याच दिवशी 5 पदके जिंकली. स्टार नेमबाज मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता या त्रिकुटाने भारताला पहिले पदक मिळवून दिले. नेमबाजीत आणखी एक पदक जिंकले तर रोइंगमध्ये देशाला आतापर्यंत 3 पदके मिळाली आहेत.


दरम्यान, गेल्या वर्षी इजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या प्रेसिडेंट कपच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने सुवर्ण पदक जिंकले होतं. या कामगिरीमुळे जागतिक शुटर ऑफ द इअरसह गोल्डन टारगेटचा पहिला भारतीय मानकरी रुद्रांक्ष ठरला होता. त्याला या स्पर्धेत 15000 डॉलरचे म्हणजे जवळपास 12 लाख भारतीय रुपये बक्षीस मिळाले होते.