IND vs SL 3rd ODI : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमच्या वळणाच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा टीम इंडियाच्या फलंदाजाचा कस लागलाय. श्रीलंकेने भारताला पराभव करून मालिका 2-0 ने जिंकली. अखेरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत सात गडी गमावून 248 धावा केल्या. प्रत्युत्तरात संपूर्ण भारतीय संघ 26.1 षटकांत 138 धावांत सर्वबाद झाला. भारतीय फलंदाजी क्रम पुन्हा एकदा श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर फिक्का दिसला. टीम इंडियाच्या फलंदाजीचा बॅकबोन विराट कोहली या मालिकेत देखील झुंजताना दिसला. अशातच आता श्रीलंकन खेळाडूंनी विराट कोहलीला डिवचण्याची हिंमत केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली नव्हती. शुभमन गिल लवकर बाद झाल्यानंतर श्रीलंकन संघाने रोहित आणि विराट कोहलीला टार्गेट केलं. श्रीलंकन गोलंदाजांनी विराट कोहलीला निशाण्यावर घेतलं अन् धावा रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी 5 व्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर विराटने सेफ गेम खेळला पण गोलंदाज असिथा फर्नांडो याने विराटला डिवचलं. त्यावेळी फर्नांडोने विराटला असं काही म्हटलं की विराटला देखील राग आला. दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.



दरम्यान, श्रीलंकेने विराटचा बदला घेतल्याचं बोललं जातंय. श्रीलंका फलंदाजी करत असताना विराटने अँग्रेशन दाखवलं होतं. अविष्का फर्नांडोला बाद केल्यानंतर विराटने श्रीलंकेवर प्रेशर टाकलं होतं. त्यावरून श्रीलंकेच्या गोलंदाजांनी विराटला डिवचल्याचं बोललं जातंय. पण विराटचा स्वभाव क्रिडाप्रेमींना माहिती आहे. विराटशी ज्याने पंगा घेतला त्याचा हिशोब चुकता होतोच. आता विराट असिथा फर्नांडो हिशोब क्लियर करणार का? असा सवाल विचारला जात आहे.



टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.


श्रीलंका : चरिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेललागे, महेश तीक्षाना, जेफ्री वेंडरसे आणि असिथा फर्नांडो.