मुंबई : सध्या एशिया कपचा  (Asia Cup 2022) थरार पहायला मिळतोय. या एशिया कपनंतर टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया या उभयसंघात टी 20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. तसंच काही दिवसांनी टी 20 वर्ल्ड कप 2022 चं आयोजनही होणार आहे.  या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडिया विरुद्धच्या टी 20 सारिजसाठी आणि वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. (aus tour of india 2022 australia announced squad against team india t20i series also upcoming t20i world cup aaron finch lead team)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. एरोन फिंच टीम इंडिया विरुद्धच्या टी 20 मालिका आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करणार आहे. सिंगापूरच्या टीम डेव्हिडला संधी देण्यात आली आहे. तर स्टार ओपनर डेव्हिड वॉर्नरला टीम इंडिया विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र डेव्हिड टी 20 वर्ल्ड कपसाठी संघासोबत जोडला जाणार आहे.


ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (Austrlia Tour India 2022)


ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही 20 सप्टेंबरपासून होणार आहे. उभयसंघात 3 सामने खेळण्यात येणार आहेत. या तिन्ही सामन्याचं आयोजन हे 20, 23 आणि 25 सप्टेंबरला अनुक्रमे मोहाली, नागपूर आणि हैदराबाद येथे करण्यात आलंय.


टीम इंडिया विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम : एरोन फिंच (कर्णधार), कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, एशटन एगर, टीम डेविड, जोश हेझलवुड, जोश इंगलिश, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव स्मिथ, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड आणि एडम झॅम्पा. 



टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम ऑस्ट्रेलिया : एरोन फिंच (कॅप्टन), डेविड वार्नर, पॅट कमिन्स, एश्टन एगर, टीम डेविड, जोश हेझलवुड, जोश इंगलिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव स्मिथ, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, एडम जम्पा.