Aus vs Eng : टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ चांगल्या फॉर्मात आहे. यानंतर इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Eng vs Aus) वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज डेव्हिड मलानने (Dawid Malan) ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले. दुखापतीमुळे वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल आणि फायनलला मुकलेल्या मलानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात 134 धावा कुटल्या. डेव्हिड मलानने त्याच्या कारकिर्दीत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सर्वोत्तम कामगिरी केली आहे.


स्टार्क आणि पॅट कमिन्सच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ ढेपाळला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेव्हिड मलानच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने 9 बाद 287 धावा केल्या. सामन्यात एका टप्प्यावर 66 धावांत 4 गडी गमावल्याने इंग्लंडचा संघ (team england) अडचणीत दिसत होता. त्यानंतर संघ 300 च्या जवळपास पोहोचेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण एकट्या मलानने 128 चेंडूत 134 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, पॅट कमिन्सची घातक गोलंदाजी आणि अॅडम झम्पाच्या फिरकीपुढे विश्वविजेता इंग्लडचा संघ ढेपाळला होता. पण डेव्हिड मलान एका बाजून धावा काढतच होता.


शतक पूर्ण करुन मलान बाद


इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय अवघ्या 6 धावा करून स्टार्कचा बळी ठरला. तर कमिन्सने फिल सॉल्टलाही बाद केले. 20 धावांवर इंग्लंडचे दोन फलंदाज बाद झाल्यावर मलानने डाव सांभाळण्याचे काम केले. पण इंग्लंडच्या संघाच्या विकेट पडतच राहिल्या. 30 षटकांत 158 धावांवर इंग्लंडची सहावी विकेट पडली. त्यानंतरही
मलानने हळूहळू धावसंख्या 158 वरून 259 वर नेली. 46 व्या षटकात तो बाद झाला तेव्हा मलानने आपले शतक पूर्ण केले होते 


दरम्यान, मलानने 128 चेंडूत 134 धावांची खेळी खेळली. मलानने 12 चौकार आणि 4 षटकार मारले. बाद झाल्यानंतर मलान पॅव्हेलियनमध्ये परतत असताना सर्वजण आदराने उभे राहिले. त्याच्या योगदानामुळे इंग्लंडने 50 षटकांत 9 गडी गमावून 287 धावा केल्या.