T20 World Cup : स्टार कॅप्टनच्या डोक्याला दुखापत, वर्ल्ड कपमधून बाहेर?
टी 20 वर्ल्ड कपआधी (t20 world cup 2022) स्टार बॅट्समनला दुखापत (Injury) झाली आहे.
मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) टी 20 वर्ल्ड कप मोहिमेला (T20 World Cup 2022) 23 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध (IND vs Pak) 2 हात करणार आहे. याआधी क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली आहे. (aus vs eng 2nd t20i australia star batter david warner injured he suffer head injurey t 20 world cup)
आयपीएलमध्ये 2016 साली सनरायजर्स हैदराबादला चॅम्पियन करणारा आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅट्समन डेव्हिड वॉर्नरच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधील पहिला सामना 22 ऑक्टोबरला खेळणार आहे. त्याआधी वॉर्नरला दुखापत झाल्याने टीम मॅनेजमेंटच्या चिंतेत वाढ झाली आहे.
नक्की काय झालं?
डेव्हिड वॉर्नरला इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात दुखापत झाली. वॉर्नर फिल्डिंग करत असताना त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्याचं झालं असं की वॉर्नर मोईन अलीचा कॅच घेण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान वॉर्नर बाउंड्री लाईनच्या जवळ डोक्यावर पडला. वॉर्नर या दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यातून बाहेर पडलाय. वॉर्नर सध्या तुफान फॉर्मात आहे. वॉर्नरची ही दुखापत गंभीर असेल, तर त्याला वर्ल्ड कपलाही मुकावं लागू शकतं. जर वॉर्नर वर्ल्ड कपमधून बाहेर पडला, तर ऑस्ट्रेलियासाठी मोठा झटका असेल. ं
टी 20 र्वल्ड कपसाठी टीम ऑस्ट्रेलिया : एरॉन फिंच (कॅप्टन), डेविड वार्नर, पॅट कमिन्स, एश्टन एगर, टीम डेविड, जोश हेझलवूड, जोश इंगलिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव स्मिथ, केन रिचर्डसन, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड आणि एडम झॅम्पा.