मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियाची AUS vs IND 3rd Test घोषणा करण्यात आली आहे. तडाखेबाज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma ) याचे संघात कमबॅक झाले आहे. तर नवदीप सैनीला (Navdeep Saini) टेस्ट पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी (Sydney Tes) क्रिकेट मैदानावर उद्या पासून तिसरा  कसोटी सामना होत आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने एक आणि टीम इंडियाने एक सामना जिंकत कसोटी मालिकेत  बरोबरी केली आहे. आता रोहित शर्मा तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार असल्याने टीम इंडियाचे पारडे जड झाले आहे. दरम्यान, टीम इंडियाने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात बदल केले आहेत. तिसऱ्या कसोटीसाठी भारताने संघात दोन बदल केले आहेत.


कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि नवदीप सैनी यांना संधी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या कसोटीत जलद गोलंदाज उमेश यादव जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्या जागी निवड समितीने नवदीप सैनीवर विश्वास दाखवला आहे. तो भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण करेल. उमेश यादवच्या जागी शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन यांच्यात चुरस होती. मात्र, सैनीवर विश्वास टाकण्यात आला आहे.


सलामीवीर मयांक अग्रवाल याच्या जागी आता रोहित शर्माला असणार आहे. पहिल्या दोन्ही कसोटीत मयांक अग्रवालला धावा करता आल्या नव्हत्या. त्यामुळे त्याच्या जागी रोहितला संधी देण्यात आली आहे. रोहितचा फक्त संघात समावेश झाला नाही तर त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. त्यामुळेच तिसऱ्या कसोटीकडे लक्ष लागले आहे. विराटच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेने चांगले नेतृत्व करत सामने जिंकले आहेत. त्यामुळे रोहितच्या समावेशाने टीम इंडिया अधिक मजबूत झाली आहे.


टीम इंडिया : तिसरी कसोटी संघ -


अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, आर अश्विन, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज,