Nathan Lyon : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्या खेळवला गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कांगारूंनी पाकिस्तानला 361 धावांनी पराभूत केलंय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लियॉनने (Nathan Lyon) कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या 500 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये 500 कसोटी बळी (500 Test Wickets) घेणारा लियॉन हा जगातील 8 वा आणि ऑस्ट्रेलियाचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. शेन वॉर्न आणि ग्लेन मॅग्राच्या यादीत नॅथन लियॉनने स्थान मिळवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 487 धावांचा डोंगर उभारला होता. त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा डाव 271 धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियासाठी सामना आता ताब्यात आला होता. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लियॉनने पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 233 धावांवर डाव जाहीर केला. ऑस्ट्रेलियाने 449 धावांचं आव्हान पाकिस्तानसमोर ठेवलं. मात्र, पाकिस्तानची फलंदाजी पुन्हा फेल ठरली. पाकिस्तानने दुसऱ्या डावात फक्त 89 धावा केल्या अन् ऑस्ट्रेलियाने दमदार विजय मिळवला आहे.


कसोटीमध्ये 500 विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंची यादी


मुथय्या मुरलीधरन (800 विकेट्स)
शेन वॉर्न (708 विकेट्स)
जेम्स अँडरसन (690 विकेट्स)
अनिल कुंबळे ( 619 विकेट्स)
स्टुअर्ट ब्रॉड (604 विकेट्स)
ग्लेन मॅकग्रा (604 विकेट्स)
अँड्र्यू वॉल्श (519 विकेट्स)
नॅथन लियॉन (501 विकेट्स)



पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, सर्फराज अहमद (विकेटकीपर), आगा सलमान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, आमेर जमाल, खुर्रम शहजाद.


ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.