AUS vs SA: नशिब असावं तर असं! गोळीच्या स्पीडने आलेला बॉल खेळायला गेला अन्...; पाहा Video
Ball hit stump of batsman dean elgar: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड (Scott Boland) बॉलिंग करत होता. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आगळंवेगळं चित्र पहायला मिळालं. पहिला चेंडू स्कॉटने गोळीगत सोडला.
AUS vs SA, Dean Elgar : ऑस्ट्रेलिया आणि साऊथ अफ्रिका (Australia vs South Africa) यांच्या खेळलेल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात (Boxing Day Test) ऑस्ट्रेलियाने अफ्रिकेचा पहिला डाव 189 गंडाळला. त्यानतंर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी एका गड्याच्या बदल्यात 45 धावा केल्या आहेत. कॅमरून ग्रीनच्या (Cameron Green) भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन संघ टिकू शकला नाही. तर स्टार्कने दोन विकेट घेतल्याने साऊथ अफ्रिकेची तारंबळ उडाली. (aus vs sa scott boland ball hit stump of batsman dean elgar australia vs south africa boxing day test watch video marathi news)
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक मनोरंजक दृष्य पहायला मिळाली. मार्नस लाबुशेनचा (Marnus Labuschagne) कॅच खास चर्चेत राहिला. तर दुसरीकडे डीन एल्गरचा (Dean Elgar) कट अॅण्ड बोल्ड देखील चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा - AUS vs SA: चीते की चाल, बास की नजर आणि लाबुशेनचा कॅच... थक्क करणारा Video पाहाच!
दक्षिण अफ्रिकेची पहिल्या डावातील 13 वी ओव्हर सुरू होती. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड (Scott Boland) बॉलिंग करत होता. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आगळंवेगळं चित्र पहायला मिळालं. पहिला चेंडू स्कॉटने गोळीगत सोडला. त्यावेळी एल्गरला बॉलच्या स्पीडचा (Scott Boland Bowling) अंदाज आला नाही. त्याने पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला.
पाहा Video -
दरम्यान, स्कॉटचा बॉल एल्गरच्या बॅटला कट लागून स्टंप्सच्या दिशेने गेला आणि बॉल स्टंप्सला (Ball hit stump) देखील लागला. मात्र, बॉलचा स्पीड कमी झाल्याने बेल्स उडाल्या नाहीत. बेल्स (Stumps Bails) स्टंप्सवरून खाली न पडल्यानं त्याला नॉटआऊट (Not Out) ठरला. सांताक्लॉजचे गुड बॉयला गिफ्ट म्हणत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने (Nathan Lyon) यावेळी स्लेजिंग (Sledding) करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं.